तांदळाचे भाव वाढणार? हे आहे प्रमुख कारण

rice

फोटो प्रतीकात्मक

पुणे : महाराष्ट्रास अति पावसामुळे ओला दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतू तांदळाचे मुख्य उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचा विपरित परिणाम भात उत्पादनावर होऊ शकतो. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात घट झाल्यास सरकार त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांमध्ये विक्रमी उष्णतेमुळे गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने देशाच्या अन्नसुरक्षेला धोका असल्याचे सांगून भारताने मे महिन्यात गव्हाच्या शिपमेंटवर बंदी घातली होती. अन्न पुरवठ्याचे संरक्षण करण्यासाठी भारताने साखर निर्यातीवरही बंदी घातली होती. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्टपर्यंत धानाचे क्षेत्र ३०.९८ दशलक्ष हेक्टरपर्यंत घसरले आहे, जे एका वर्षापूर्वी ३५.३६ दशलक्ष हेक्टर होते. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या हंगामात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या दक्षिण आशियाई देशात तांदळाच्या एकूण क्षेत्रामध्ये आतापर्यंत १२% घट झाली आहे.

Exit mobile version