महाराष्ट्रात उस तोडणीची स्थिती अद्यापही गंभीर 

Sugarcane-harvesters

प्रतीकात्मक फोटो

कोल्हापूर : देशभरात यंदाच्या ऊस हंगामाचा परिपूर्ण अंदाज कोणत्या यंत्रणाना अजूनही येत नसल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्याचा मध्य काळ येऊनही अजूनही महाराष्ट्रासारख्या राज्यात ऊसतोडणीची स्थिती गंभीर आहे. यामुळे महाराष्ट्रातील कारखानेही मे अखेरपर्यंत चालतील अशी शक्यता आहे. साखर उद्योगातील संस्थांनी प्रत्येक टप्प्यावर वाढीव साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला केलेला अंदाज चुकला असून आता संस्था नव्याने वाढवून साखर उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे.

ऊस हंगाम अंतिम टप्प्यात येत असतानाही अजून ऊस शिल्लक राहत असल्याने साखर उद्योगातील संस्था सातत्याने जादा साखरेचा अंदाज वर्तवीत आहेत.

देश पातळीवरील इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची नुकत्याच झालेल्या बैठकीत देशात तब्बल ३५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये अजूनही साखर कारखाने सुरू असल्याने याचा आधार घेऊन ‘इस्मा’ ने वाढीव साखरेचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये अजूनही साखर कारखाने सुरू आहेत. महाराष्ट्रात तर साखर उत्पादन येत्या आठवड्याभरात १२५ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात अजूनही ऊस शिल्लक असल्याने उत्पादनात आणखी वाढ अपेक्षित आहे. अंतिम टप्प्याचा आढावा घेण्यासाठी ‘इस्मा’च्या पदाधिकाऱ्यांनी विविध कारखान्यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. यात उत्पादन वाढणार असल्याचे स्पष्ट झाले. ‘इस्मा’ने महाराष्ट्रात होणाऱ्या साखरेचा अंदाज १३४ लाख टन वर्तवला आहे. १ महिन्यापूर्वी हाच अंदाज १२६ लाख टनांचा होता. कर्नाटकाचा ५५ लाख टनांचा अंदाज वाढवून तो ६० लाख टनांवर करण्यात आला. उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये किरकोळ बदल अपेक्षित आहेत. १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुमारे ८२ लाख टनांचा प्रारंभिक साठा होता. यंदा २७२ लाख टनांचा देशांतर्गत वापर, ९० लाख टनांहून अधिक साखर निर्यात आणि अंदाजे ३५० लाख टन उत्पादन लक्षात घेता, ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतचा बंद साठा अंदाजे ६८ लाख टन असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कारखान्यांकडून परराज्यांतून ऊसतोडणी यंत्र महाराष्ट्रत गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या सप्ताहाअखेर तब्बल ११८ साखर कारखाने बंद झाले होते. यंदा केवळ ३४ साखर कारखाने बंद झाले आहेत. यापैकी २६ कारखाने तर केवळ कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातीलच आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखाने बंद आहेत. हे जिल्हे वगळता अन्य सर्वच जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने सुरू असल्याने साखर हंगाम कधी संपेल या बाबतचा अंदाजच व्यक्त होत नसल्याची स्थिती प्रशासन पातळीवर आहे. मजुरांकडून कडून ऊसतोडणी अशक्‍य होत असल्याने बाहेरच्या राज्यातून ऊसतोडणी यंत्रे मागवून ऊसतोडणी करण्यासाठी काही कारखाने प्रयत्न करत आहेत.  

Exit mobile version