कृषी ड्रोन तयार करणार्‍या भारतातील प्रमुख ५ कंपन्या, जाणून घ्या कोणत्या आहेत?

dron

पुणे : शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा पारंपारिक कृषी यंत्रांपासून आता आर्टीफिशयल इन्टेलिजन्स, सॅटेलाईट सेवा, ड्रोन आदींपर्यंत येवून ठेपला आहे. शेतीत ड्रोनचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकारने देखील पुढाकार घेतला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भरोघोस निधीची घोषणा केली आहे. याच अनुषंगाने अनेक भारतीय कंपन्यांनी कृषी ड्रोन निर्मिती सुरु केली आहे. आज आपण भारतातील प्रमुख ५ ड्रोन उत्पादक कंपन्यांची माहिती जाणून घेणार आहोत.

जनरल एरोनॉटिक्स
जनरल एरोनॉटिक्स ही देशातील अग्रगण्य कृषी ड्रोन कंपन्यांपैकी एक आहे. जनरल एरोनॉटिक्सच्या स्प्रे ड्रोन तंत्रज्ञान आणि कृषी ड्रोनद्वारे विविध कृषी रसायने, खते आणि विशेष पोषक घटकांसह फवारणी केली जाऊ शकते. नगदी पिके, अन्न पिके, बागायती पिके आणि लागवड पिके यासाठी ड्रोन अनेक प्रकारे काम करू शकतात. यासोबतच जनरल एरोनॉटिक्सचे ड्रोन ९७% पाण्याची बचत करतात, ३० पट कार्यक्षमता, २० टक्के पैशांची बचत करतात.

पारस एरोस्पेस
पारस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नोलॉजी लिमिटेडची उपकंपनी आहे. पारस एरोस्पेसचे उद्दिष्ट भारत आणि जगामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हींसाठी युएव्हीच्या (UAV) विविध आवश्यकतांसाठी उपाय उपलब्ध करून देणारी आघाडीची स्वदेशी तंत्रज्ञान विकास कंपनी आहे. कंपनीच्या प्रमुख वर्टिकलमध्ये मिलिटरी यूएव्ही, इंडस्ट्रियल यूएव्ही, स्वदेशी पेलोड डेव्हलपमेंट, रेग्युलेटरी कंप्लायन्स कन्सल्टन्सी आणि अ‍ॅग्रीकल्चर फोकस्ड यूएव्ही यांचा समावेश आहे. ही कंपनी अ‍ॅग्री-टेक सोल्यूशनसह ड्रोन ऑटोमेशनकडे लक्ष देणार्‍या कंपन्यांना तांत्रिक मदत करते.

स्कायक्राफ्ट्स एरोस्पेस
किसान ड्रोन हे जगातील सर्वात लहान स्प्रिंकलर ड्रोन आहे, जे फवारणी करणे सोपे आणि अधिक अचूक बनवते. हे सेन्सर्स आणि ऑटोपायलट सिस्टमसाठी अचूक फवारणी आणि स्थानिकीकरण प्रणाली एकत्रित करते, ज्यामुळे ते बाजारपेठेतील सर्वात विश्‍वासार्ह हवाई फवारणी सोल्यूशन बनते. अनेक फवारणी परिस्थितींसाठी शेतकरी ड्रोन एक उत्कृष्ट फवारणी उपाय म्हणून विकसित केले गेले आहेत. हे मजुरांशिवाय किंवा दुर्गम भागात पिकांवर फवारणी करू शकते.

प्राइम युएव्ही (UAV)
ही कंपनी कृषी सेवा ड्रोन सेवेचा वापर करून शेतकर्‍याला त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि कीटकनाशकांचा खर्च कमी करण्यास मदत करते. कृषी सेवा ड्रोन शेतीवर कीटकनाशक फवारणी करण्याच्या पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत अचूक शेतीसाठी आदर्श उपाय प्रदान करतात.

डम्स
डम्सचे कृषी ड्रोन कीटकनाशके आणि पीक पोषक फवारणी, पर्यावरण निरीक्षण, नैसर्गिक आपत्ती (पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळ), पीक नमुना डेटा आणि वनस्पती संख्या, माती सुपीकता नकाशे आदींसाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात.

Exit mobile version