८ लाख टनांहून अधिक शेतमालाची वाहतूक; वाचा सविस्तर

kisan rail

मुंबई : शेतकर्‍यांना दूरच्या, मोठ्या आणि अधिक किफायतशीर बाजारपेठांपर्यंत शेतमाल पोहचविण्यासाठी किसान रेलची सेवा उपलब्ध आहे. किसान रेलने कोरोना महामारीच्या काळात फळे आणि भाजीपाला वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशाला कोरोनाचा इतका फटका बसला होता की संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करावा लागला, त्यामुळे फळे आणि भाजीपाल्याची वाहतूकही ठप्प झाली. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही हाल झाले. या संकटकाळात किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतमालाची वाहतूक करण्यात आली.

सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने ०७ ऑगस्ट २०२० ते २३ जून २०२२ पर्यंत किसान रेलमधून सुमारे २,३५९ किसान रेल चालवल्या आहेत, ज्यामध्ये कांदा, केळी, बटाटा, आले, लसूण, आंबा, द्राक्षे यासह सुमारे ८ लाख टन नाशवंत मालाची वाहतूक करण्यात आली आहे. याचा फायदा लाखों शेतकर्‍यांना झाला आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, किसान रेल देशाच्या अन्नदात्यांचे थेट बाजारपेठांशी जोडून त्यांचे उत्पन्न वाढवण्याचे साधन बनत आहे. आतापर्यंत २,३५९ किसान रेल सेवांद्वारे ८ लाख टनांहून अधिक कृषी उत्पादनाची वाहतूक करण्यात आली आहे. फळे आणि भाज्यांच्या वाहतुकीवर सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जात आहे. त्याचवेळी किसान रेल शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात भूमिका बजावत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

किसान रेल म्हणजे काय?
मोदी सरकारने सन २०२० मध्ये किसान रेल सुरु केली. ज्याचा मुख्य उद्देश शेतकर्‍यांची पिके, भाजीपाला आणि फळे विशिष्ट कालावधीत रेल्वेद्वारे सुरक्षित बाजारपेठेत पोहोचवणे हा होता, कारण धान्य, फळे आणि भाजीपाला याशिवाय खूप लवकर खराब होतात. जे साठवता येत नाही. किसान ट्रेनमध्ये फळे, भाजीपाला इत्यादी नेण्याची योग्य व्यवस्था आहे. किसान रेल शेतकर्‍यांना दूरच्या, मोठ्या आणि अधिक किफायतशीर बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी विशाल रेल्वे नेटवर्क वापरण्यास सक्षम करते. हे मल्टी कमोडिटी, मल्टी कन्सिग्नर, मल्टी कन्सिग्नी आणि मल्टी स्टॉपपेज या संकल्पनेवर आधारित आहे.

Exit mobile version