आदिवासी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळेल वीज पंप / तेल पंप; जाणून घ्या सविस्तर

agricultural pumps

महाराष्ट्रातील ८५ टक्के आदिवासी लोकसंख्या ही शेती व्यवसायाशी निगडीत आहे. त्यापैकी ४० टक्के आदिवासी शेतकरी असून ४५ टक्के आदिवासी शेतमजूर आहेत. महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा शेती विकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या साधनाचा व उर्जेचा पुरेपुर उपयोग करुन त्याद्वारे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणून आदिवासींचा आर्थिक विकास साधण्याच्या हेतूने १०० टक्के अनुदानावर वीज पंप/तेलपंप पुरविण्यात येत आहेत.

या योजनेखाली सर्वसाधारणपणे ३ किंवा ५ अश्वशक्तीचे वीज पंप / तेल पंप मंजूर करण्यात येतात. राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र व क्षेत्राबाहेरील आदिवासी शेतकऱ्याकडे किमान ६० आर (दीड एकर) आणि कमाल ६ हेक्टर ४० आर (१६ एकर) इतकी लागवाडीयोग्य जमीन उपलब्ध आहे. असे शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.

योजनेसाठी पात्रता

योजनेचे स्वरुप

योजनेंतर्गत प्रत्येक आदिवासी व्यक्तिला / कुटुंबाला / सामुहिक प्रकल्पात / कार्यक्रमांतर्गत आर्थिक मर्यादा रु. १५०००/- पर्यंत.

अ) उत्पन्न निर्मितीच्या किंवा वाढीच्या योजना ब) प्रशिक्षणाच्या योजना क) मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या योजना ड) आदिवासी कल्याणात्मक योजना.

‘अ’ या गटात अनुदानाची मर्यादा याप्रमाणे

साभार – महाराष्ट्र शासन कृषी विभाग

Exit mobile version