यूट्यूबवरुन शेती शिकत दोन तरुण शेतकर्‍यांनी घेतले लाखोंचे उत्पादन

youtub

जालना : इंटरनेट व सोशल मीडियाचे व्यसन लागल्याने आजची युवापिढी भरकटत चालली असल्याचा आरोप नेहमीच होतो. मात्र काही तरुण याच इंटरनेट व सोशल मीडियाचा योग्य वापर करुन यश मिळवतात. असेच काहीसे जालना जिल्ह्यातील घनसावंगी जिल्ह्यातील रामेश्वर कोंडीबा वायसे आणि काशिनाथ शेंबडे या तरुण शेतकर्‍यांच्या बाबतीत घडले आहे. या दोन तरुणांनी यूट्यूबवरुन अधुनिक शेतीचे धडे घेत स्वत:च्या शेतात यशस्वी प्रयोग करुन दाखविला आहे. यामुळे त्यांना वर्षाकाठी लाखों रुपयांचे उत्पादन मिळण्याचा मार्गही खुला झाला आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रामेश्‍वर व काशिनाथ या दोन्ही तरुणांनी नोकरीचा पाठलाग सुरु केला. मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीत काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं दोघांनी ठरवलं आणि यूटयूब वर शेतकर्‍यांचे आधुनिक शेती, फळंशेती,फुलशेती वरील नवनवे प्रयोग पाहून आपल्या शेतीच्या मनाने करण्याजोगा प्रयोग म्हणून ड्रॅगन फ्रुट शेतीला त्यांनी पसंती दिली, आणि ड्रॅगन फ्रुटच्या यशस्वी शेतकर्‍याचा शोध त्यांनी सुरु केला. सांगोला भागातील ड्रॅगन फ्रुटचे यशस्वी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची माहिती मिळवून त्यांनी संबंधित शेतकर्‍याची भेट घेवून ड्रॅगन फ्रुट लागवडीची सविस्तर माहिती जाणून घेतली.

त्यानंतर रामेश्वरने स्वत:च्या १ एकर तर काशिनाथने दीड एकर मुरमाड जमिनीत रेड जंबो जातीच्या ड्रॅगन फ्रूट चा प्रयोग करून पाहिला. एक वर्षा नंतर तो प्रयोग यशस्वी ठरलाय. त्यांनी एक एकरमध्ये ५०० पोल उभारण्यात आले. प्रती पोल ४ रोपं या प्रमाणे रेड जंबो या जातीची २ हजार रोपे सांगोल्याहून विकत आणली. ४० रुपये एका रोपाच्या किमीप्रमाणं २ हजार रोपं शेतापर्यंत आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च ३५ हजार रुपये झाला. रोप,शेतात लावण्याचे पोल, त्यावरील रिंग, शेतीची मशागत व लावणीसाठी जमीन बनवण्या पर्यंतचा खर्च, वाहतूक खर्च, कामगारांची मजुरी असा सुमारे ४ लाखापर्यंत खर्च आला. पहिल्याच प्रयत्नात भरघोस उत्पादन मिळाल्यामुळे त्यांचा खर्च निघून कमाईला सुरुवात झाली आहे. सध्या १४० ते १७० रुपये किलोच्या भावाने काही व्यापारी विकत घेऊन जात असल्याने आता उत्पन्नाची हमी त्यांना मिळू लागली आहे. त्यांना यावर्षी दीड टन पर्यंत तर पुढच्या वर्षी ५ टन पर्यंत उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version