शेतकर्‍यांनो ‘ई-केवायसी’ अपूर्ण असेल तरी घाबरु नका; केंद्रीय कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

farmer super app lunches

प्रतीकात्मक फोटो

मुंबई : ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो शेतकर्‍यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्णच होती. यामुळे शेतकरी केंद्र सरकारच्या मोठ्या आर्थिक लाभापासून वंचित राहण्याती शक्यता निर्माण झाली होती. मात्र शेतकरी हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारने ई-केवासी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांना पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी याबाबतची घोषणा केली. मार्च २०२२ पासून आजपर्यंत चार वेळा हा मुदतवाढ झालेली आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाकाठी शेतकर्‍यांच्या खात्यावर ६ हजार रुपये अदा केले जात. तीन हप्त्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकर्‍यांना या योजनेचा १२ वा हप्ता मिळणार आहे. जे नागरिक पात्र नाहीत ते देखील योजनेचा लाभ घेत आहेत. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास येताच संपूर्ण देशात ई-केवायसी करण्याची अट घालण्यात आली आहे.

मार्च २०२२ पासून आजपर्यंत चार वेळा हा मुदतवाढ झालेली आहे. आताही सलग चौथ्यावेळेस मुदतवाढ करण्यात आली आहे. ई-केवायसी प्रमाणीकरण आणि पोर्टलवर डाटा अपलोड करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एक महिन्याची मुदतवाढ केली आहे. अनेक शेतकर्‍यांनी यामध्ये सहभाग न नोंदवल्यामुळे पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा लागणार आहे.

Exit mobile version