वांग्यांच्या बंपर उत्पादनासाठी ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर करा, होईल मोठा फायदा

Eggplant

जळगाव : वांगी ही सर्वसामान्य लोकांच्या आवडीची फळभाजी आहे. वांग्या लागवडीपासून मोठा नफा कमविता येतो. यासाठी तंत्रशुध्द पध्दतीने वांग्याची लागवड करणे आवशयक असते. या पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगळे मानवते. महाराष्ट्रातील हवामानात जवळजवळ वर्षभर वांग्याचे पीक घेता येवू शकते. महाराष्ट्रातील हवामानात वांगी पिकाची लागवड तिनही हंगामात करता येवू शकते. खरीप हंगामासाठी बियांची पेरणी जूनच्या दुसर्‍या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै – ऑगस्ट मध्ये केली जाते. रब्बी किंबा हिवाळी हंगामासाठी बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये लावतात. उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात पेरुन रोपांची लागवड फेब्रुवारीत केली जाते.

चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे भरपूर उत्पादन येते. रोप लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करुन चांगळी मशागत करावी व शेणखत मिसळावे व जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सर्‍या-वरंबे पाडावेत, हलक्या जमिनीत ७५ बाय ७५ सें.मी.तर जास्त वाढणार्‍या किंवा संकरित जातीसाठी ९० बाय ९० सें.मी.अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणार्‍या जातींसाठी ९० बाय ७५ सें. मी. व जास्त वाढणार्‍या जातींसाठी १०० बाय ५९० सें.मी.अंतर ठेवावे.

कमी वाढणार्‍या जातीसाठी हेक्टरी ४०० ते ५०० ग्रॅम बी पुरेसे होते. जास्त वाढणार्‍या किंबा संकरित जातीसाठी हेक्टरी १२० ते १५० ग्रॅम बी पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रती किलो ३ ग्रॅम थायरम चोळावे. मध्यम काळ्या जमिनीसाठी हेक्टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फूरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे आणि उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी द्यावा, खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.

वांगी या पिकावर प्रामुख्याने तुडतुडे, मावा, पांढरीमाशी व कोळी या रस शोषणार्‍या किडी आणि शेंडा व फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. वांगी पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात :

१) पीक लागवडीपूर्वी शेताची खोल नांगरट करावी. ज्या शेतात अगोदर टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय भाज्या या पिकांची लागवड केळी असल्यास तेथे वांगी पिकाची लावगड करु नये.
२) रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात कार्बोफ्युरॉन ३० ग्रॅम किंबा फोरेट १० ग्रॅम टाकावे. (१ बाय १ मी. वाफा) तसेचरोपांवार डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा मार्शळ १० मि.ली. १० लीटर पाण्यातून वापरावे.
३) रोपांची पुर्नलागवड करताना रोपे इमिडॅक्लोप्रीड १० मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्राबणात तीन तास बुडवून ठेवाबीत व नंतर लावावीत.
४) लागवडीनंतर ४५ दिबसांनी तुडतुडे, माबा, पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट ३० टक्के प्रवाही, १० मि.ली. किंबा मिथिल डिमेटॉन २५ टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा स्पार्क १० मि.ली. १० लीटर पाण्यातून फवारावे.
५) लागवडीनंतर दोन महिन्यांनी किडलेली शेंडे ब फळे आढळल्यास ती गोळा करुन नष्ट करावीत तसेच ४ टक्के निंबोळी अर्क किंबा सायपरमेथिन २५ टक्के प्रवाही ५ मि.ली. १० लीटर पाण्यातून फवारावे.
६) वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा डायकोफॉल २० मि.ली. १० लीटर पाण्यातून फवारावे.

Exit mobile version