गवारचे बंपर उत्पादन घेण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरा, होईल मोठा फायदा

gavar Guar

नाशिक : गवार हे बहुउपयोगी भाजीपाला पीक आहे. या पिकाची लागवड भाजीच्या हिरव्या शेंगासाठी, जनावराचे खाद्य तयार करण्यासाठी, हिरवळीचे खत तयार करण्यासाठी तसेच गवार गम तयार करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कारणासाठी करतात. गवारीच्या बियापासून तयार करण्यात आलेल्या पावडरपासून गवार गम हा पदार्थ तयार होत असल्याने या पिकाला नगदी पीक म्हटले जाते.

शेतकर्‍याकडे उपलब्ध असलेल्या स्थानिक वाणांचा शेतकरी वापर करतात. या शिवाय भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी भाजीपाला पीक म्हणून घेण्यासाठी काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे,
१) फुले गवार : गवार पिकाचा हा बाण सन २०१६ मध्ये स्थानिक जातींच्या संग्रहामधून निवड पध्दतीने विकसित केळा असून तो पश्चिम महाराष्ट्रात
लागवडीसाठी शिफारस केला आहे. या वाणाच्या शेंगा फिक्कट हिरव्या रंगाच्या असून, मध्यम लांबीच्या तसेच चवीला अत्यंत चवदार आहेत. हा वाण खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस केला आहे. तसेच हा बाण भुरी रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. या बाणापासून हिरव्या शेंगाचे
उत्पादन ९० ते १०० क्विं./हे. (खरिप हंगाम) आणि १२० ते १३० क्विं./हे. (उन्हाळी हंगाम) मिळते.
२) पुसा दोमोसमी : ही सुधारित जात खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. उशीरा येणारी आणि भरपूर फांद्या असणारी ही
जात आहे. लागवडीपासून ७५ ते ८० दिवसात तोडणीस येते. शेंगाचा भाग मऊ असून फिक्कट हिरव्या रंगाच्या शेंगाची लांबी १० ते १२ सें.मी. असते.
३) पुसा सदाबहार : या सुधारित जातीची शिफारस खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी करण्यात आली आहे. या जातीची झाडे सरळ आणि बिगर फांद्याची असतात. या जातीच्या शेंगा हिरव्या रंगाच्या असून १२ ते १३ सें.मी. लांब असतात.
४) पुसा नवबहार : या जातीच्या झाडांना फांद्या येत नाहीत आणि शेंगाची गुणवत्ता पुसा दोमोसमी या जातीप्रमाणे असते. ही जात पुसा दोमोसमी आणि पुसा सदाबहार यांच्या संकरातून निर्माण केली आहे.
५) शरद बहार : ही सुधारित जात एन.बी.पी.जी.आर., नवी दिल्ली येथून विकसित करण्यात आली आहे. या जातीच्या झाडांना भरपूर फांद्या असतात. या जातीच्या प्रती झाडापासून १३३ शेंगा मिळतात.

हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पुरेसे असते. तसेच १० ते १५ किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. हे पीक द्विदल वर्गातील असले तरी रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देते. हेक्टरी १५ ते २० टन शेणखत याशिवाय ५०:६०:६० किलो ननत्रःस्फुरदःपालाश/हेक्टरी द्यावे. यापैकी अर्धनत्र, संपूर्ण स्फुरद ब पालाश लागवडीच्या वेळी आणि राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या प्रमुख किडी गवार पिकावर आढळतात. या सर्व किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे प्रादुर्भाव झालेली पाने खाळील बाजूस वळतात आणि पिवळी, पांढरी पडतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडे वाळून जातात. या सर्व किडींच्या नियंत्रणासाठी इमॅडोक्लोप्रीड किंवा डायमिथोईट या औषधाची १ ते १.५ मि.ली.प्रती लीटर पाण्यातून फवारणी करावी.

Exit mobile version