हेक्टरी १०० ते १२० क्विंटल उत्पादन देणार्‍या वालाच्या जाती

vala

रत्नागिरी : रब्बी हंगामात वालाच्या शेंगांची लागवड ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामासाठी जानेबारी महिन्यात केली जाते. या पिकास सर्वसाधारणपणे थंड हवामान मानवते. हे पीक हलक्या ते भारी व पाण्याच्या उत्तम निचरा होणार्‍या जमिनीत चांगले येते. वालाच्या शेंगेत प्रथिने, मॅम्रेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, चुना, लोह इ. खनिजद्रव्य भरपूर प्रमाणात असतात. तसेच अ, ब आणि क ही जीवनसत्वेही असतात. वालाच्या काही सुधारित जाती अशा आहेत, ज्या हेक्टरी १०० ते १२० क्विंटल उत्पादन देतात.

वालाच्या सुधारित जाती

१) कोकण भुषण : ही जात कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे विकसित केली आहे. ही लबकर येणारी जात असून कोवळ्या हिरव्या रंगाच्या शेंगाची काढणी पेरणीनंतर ५५ते ६० दिवसांनी करता येते. या जातीची झाडे ७५ ते ८० सें.मी. उंचीने वाढतात. शेंगेची लांबी १५ ते १६ सें.मी. असते. हेक्टरी ८० ते १०० क्विंटल उत्पादन मिळते.
२) पुना रेड : कोकण कृषि विद्यापीठाने परसबागेत लागवडीसाठी या जातीची शिफारस केली आहे. या जातीची झाडे उंच व वेलीसारखी वाढत असल्याने त्यांना आधाराची आवश्यकता असते. शेंगेचा रंग लाळ असतो व आकार चपटा असतो. हेक्टरी १२० क्विंटल उत्पादन मिळते.

३) पुसा अर्ली प्रॉलरिफिक : ही जात वेलीसारखी वाढणारी असून रब्बी व उन्हाळी हंगामात येते. शेंगा पातळ व चपट्या लांब असून झुपक्याने येतात.
४) अर्का जय : झाडांची उंची ७५ ते८० सें.मी. असते. शेंगा सालीसह भाजी करण्यास योग्य असतात. हेक्टरी ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते.
५) अर्का विजय: झाडांची उंची ७० सें.मी. एबढी झुडूपवजा असते. शेंगेंची लांबी १० ते १२ सें.मी. असून रंग हिरवा असतो. या जातीपासून हेक्टरी ८० ते ९० क्विटल उत्पादन मिळते.

Exit mobile version