सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला; राज्यातील धरणसाठ्यात मोठी वाढ

dam

पुणे : जूनच्या अखेपर्यंत पावसाने दिलेल्या ओढीमुळे राज्यापुढे जलसंकट उभे राहिले होते. ३० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्ष कमी पाऊस झाल्याने धरणांनीही तळ गाठला होता. मात्र गेल्या दहा दिवसांतील पावसामुळे राज्यावरील जलसंकट दूर झाले आहे. २० टक्क्यांपर्यंत खाली आलेला धरणांतील पाणीसाठा सध्या ३२ टक्क्यांहून अधिक झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत तो पाच टक्क्यांनी जास्त आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर पाऊस कायम राहण्याची शक्यता असल्याने धरणांतील पाणीसाठी अजून वाढण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये बेपत्ता असलेल्या पावासाचे जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात दमदार आगमन झाले. कोकण विभागातील सर्व जिल्हे, मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरू झाला. गेल्या तीन-चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस झाल्याने राज्यातील चित्र पालटले आहे. सध्यस्थितीत राज्यातील पावसाची टक्केवारीही सरासरीच्या पुढे गेली आहे.

विभागनिहाय धरणांतील पाणीसाठा
अमरावती : ३८.८५
औरंगाबाद : ३०.३८
कोकण : ५९.३७
नागपूर : ३५.६६
नाशिक : २९.०१
पुणे : २५.०९

पुढील आठवडाभर या जिल्ह्यांना असा आहे इशारा
अतिवृष्टी : पालघर, गडचिरोली,
मुसळधार : मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर

Exit mobile version