शेतीत ड्रोन वापराबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले; वाचा सविस्तर

modi drone

मुंबई : शेतीमध्ये ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी ड्रोन वापरावर देशभर डेमोचे आयोजन करण्यात आले होते. शेती व्यवसायात अमूलाग्र बदल होत असून आता ड्रोनच्या वापराने शेतकर्‍यांचे उत्पादन तर वाढेलच पण कष्टही कमी होईल. शेतीचे चित्र बदलण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

इंडिया ड्रोन फेस्टिव्हल २०२२ ला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कृषी क्षेत्रात ड्रोनचे महत्त्व सांगितले. प्रत्येत क्षेत्रामध्ये बदल हा झाला आहे. पण शेतकर्‍यांनी कोणता बदल न करता उत्पादनात वाढ केली आहे. आता संकटाचा सामना करण्यासाठी ड्रोन एक प्रभावी माध्यम ठरणार असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

ड्रोनचा वापर वाढविण्यासाठी केंद्राने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्राने भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), राज्य कृषी विद्यापीठे (एसएयू) सारख्या कृषी यंत्रसामग्री प्रशिक्षण आणि चाचणी संस्थांना ड्रोनच्या १०० टक्के खर्च आणि आकस्मिक खर्चाच्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्याची घोषणा केली.

Exit mobile version