फळबाग लागवड योजनेअंतर्गत कोणत्या फळपिकांचा समावेश; वाचा सविस्तर

Fruit crop insurance plan

सातारा : महाराष्ट्रातील जमीन व हवामान विविध फळपिकांच्या लागवडीसाठी पोषक मानली जाते. राज्यात प्रामुख्याने विभागनिहाय कोकण विभागात आंबा, काजू,नारळ व चिक्कू, पश्‍चिम महाराष्ट्रात डाळिंब, पेरु, चिकू, आवळा व सिताफळ, मराठवाडयात आंबा व मोसंबी तसेच विदर्भात संत्रा या फळपिकांचे उत्पादन घेण्यात येते. रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमामुळे फळउत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. या योजनेअतर्गत शेतकर्‍यांना वेगवेगळया प्रकारच्या जमिनीवर फळबाग लागवडीच्या पुढील रोपे उपलब्ध करुन दिली जातात.

अ) वैयक्‍तिक लाभार्थीच्या शेतावर सलग जमिनीवरील फळबाग लागवडीकरीता समाविष्ट फळपिके
(१) आंबा कलमे/रोपे (२) काजू कलमे/रोपे (३) बोर रोपे (४) सिताफळ रोपे (५) आवळा कलमे/रोपे (६) चिंच कलमे/रोपे (७) फणस कलमे/रोपे (८) कोकम कलमे/रोपे (९) चिंच, कवठ, जाभूळ रोपे (१०) चिकू कलमे (११) पेरु कलमे (१२) डाळिंब कलमे (१३) संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे/रोपे (१४) अंजीर कलमे (१५) सुपारी रोपे (१६) पानपिंपरी

ब) वैयक्‍तिक लाभार्थीच्या पडीक शेतजमिनीवरील फळबाग लागवडीकरीता समाविष्ट फळपिके
(१) आंबा कलमे/रोपे (२) काजू कलमे/रोपे (३) बोर रोपे (४) सिताफळ कलमे/रोपे (५) बांबू रोपे (६) जट्रोफा रोपे (७) औषधी वनस्पती (८) साग रोपे (९) गिरीपुष्प रोपे (१०) कडूलिंब रोपे (११) सिंधी रोपे (१२) शेवगा रोपे (१३) हादगा रोपे

क) वैयक्‍तिक लाभार्थीच्या शेताच्या बांधावर फळबाग लागवडीकरीता समाविष्ट फळपिके
(१) आंबा कलमे/रोपे (२) काजू कलमे/रोपे (३) बोर रोपे (४) सिताफळ कलमे/रोपे (५) आवळा कलमे/रोपे (६) चिंच, कवठ, जांभूळ रोपे (७) कोकम कलमे/रोपे (८) फणस कलमे/रोपे (९) बांबू रोपे (१०) कडूलिंब रोपे (११)कागदी लिंबू रोपे (१२)औषधी वनस्पती (१३) साग रोपे (१४) गिरीपुष्प रोपे (१५) सोनचाफा (१६) कढीपत्ता (१७) कडूलिंब रोपे (१८) सिंधी रोपे (१९) शेवगा रोपे (२०) हादगा रोपे (२१) जट्रोफा

योजनेअंतर्गत फळबाग लाभार्थी म्हणून निवड झाल्यानंतर लागवड करावयाच्या फळपिकाची फळपिकनिहाय शिफारस केलेल्या प्रती हेक्टर अंतराप्रमाणे कृषि विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जमीन तयार करणे, व निवड केलेल्या फळपिकाचा आराखडा तयार करुन घेण्यात यावा. आराखडयामध्ये लागवड करावयाच्या ठिकाणी फळबाग लागवडीचे १ बाय× १ बाय× १ मी. आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचे खड्डे साधारणत: तीन आठवडे उन्हामध्ये तापणे आवश्यक आहेत. लाभार्थीचे जमिनीतील असलेल्या मातीच्या नमुन्यांचे माती परीक्षण करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करु इच्छिणार्‍या शेतकर्‍यांनी कृषि विभागाच्या जिल्हा/उपविभाग/तालुका कार्यालयाकडे संपर्क साधून फळबाग लागवडीसाठी मागणी करावी.

Exit mobile version