सोयाबीनसह उडीद, मूगावर लष्करीअळीचे आक्रमण; हा आहे तज्ञांचा सल्ला

Soybean pest

औरंगाबाद : खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे. गत हंगाता सोयाबीनला चांगला दर मिळाला राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनसह उडीद, मूग ही पिके सावरत असतानाच आता या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन फळधारणेच्या प्रसंगीच हा धोका निर्माण झाल्याने याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे बोलले जात आहे.

हंगामाच्या सुरवातीपासूनच खरिपातील पिके ही धोक्यात आहेत. सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने जूनमध्ये होणार्‍या पेरण्या ह्या जुलै महिन्यात झाल्या. हे कमी म्हणून की काय, पेरणी होताच सुरु झालेल्या पावसामध्ये तब्बल महिन्याभराचे सातत्य राहिले. त्यानंतर पावसात मोठा खंड पडला. या अनियमिततेचा उत्पादनावर विपरित परिणाम होतांना दिसत आहे. पीके बहरात असतानाच ह्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही अळी थेट पिकांची पाने फस्त करते तर फळधारणेवरही या अळीचा प्रतिकूल परिणाम होतो.

हा आहे तज्ञांचा सल्ला
पिकात हेक्टरी २० ते २५ पक्षीथांबे उभे करावेत, जेणेकरुन प्रादुर्भाव वाढणार नाही. तंबाखूची पाने खाणार्‍या अळीसाठी हेक्टरी १०-१२ कामगंध सापळे लावावेत तसेच सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. पाने खाणार्‍या अळ्या, खोडमाशी, चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच ५% निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी लागणार आहे. अळींचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी शेतकर्‍यांना घ्यावी लागणार आहे.

Exit mobile version