कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक १ अब्ज डॉलर्सवर!

नवी दिल्ली : जगभरात २०१२ पासून २०२१ पर्यंत कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समधील गुंतवणुकीचं प्रमाण ९१.५ अब्ज डॉलर्सवर गेले आहे. यातील ५१ टक्के गुंतवणूक ही गेल्या व वर्षात झालेली आहे. देशभरातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समधील गुंतवणुकीनं या आर्थिक वर्षात १ अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केलाय. या उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते २०१२ सालापासून कृषी तंत्रज्ञान क्षेत्राच्या स्टार्स अप्समध्ये २.५ अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक झालीय.

फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप्सवर आयोजित परिषदेत अ‍ॅग्री स्टार्ट अप्ससाठीच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि भारत इनोव्हेशन फंडचे भागीदार हेमेंद्र माथूर यांनी कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समध्ये विकासाला प्रचंड मोठा वाव असल्याचं म्हटलं आहे. या आर्थिक वर्षा अखेरीस या क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण २.५ अब्ज डॉलर्सचा टप्पा पार पाडेल, असा विश्‍वा व्यक्त केलाय.

कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्स सध्या तिसर्‍या टप्पावर आहेत. शेतकरी जसे नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करतील अन कृषी व्यवसायाच्या नव्या संकल्पना प्रत्यक्षात यायला लागतील त्यावेळच्या टप्य्यात हे क्षेत्र आणखी विस्तारेल, असा विश्‍वास यांनी व्यक्त केलाय.

यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, जगभरात २०१२ पासून २०२१ पर्यंत कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समधील गुंतवणुकीचं प्रमाण ९१.५ अब्ज डॉलर्सवर गेलेय. यातील ५१ टक्के गुंतवणूक ही गेल्या वर्षात झालेली आहे.

कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीचा फ्लो अभ्यासल्यास अमेरिका, चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. २०११ पर्यंत भारतातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली गुंतवणूक होती ४५ दशलक्ष डॉलर्स. अलीकडच्या काही वर्षांत भारतात या क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसते आहे.

Exit mobile version