शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! ड्रोन खरेदीवर मिळेल १००% पर्यंत सबसिडी

dron

पुणे : कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढविण्यासाठी सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहे. ड्रोनचा वापर शेतीसाठी फायदेशीर असला तरी ड्रोनची खरेदी सर्वच शेतकर्‍यांना शक्य नाही. आता शेतीमध्ये ड्रोनच्या वापराला चालना दिली जात आहे. ड्रोन खरेदी करण्यासाठी शासनाकडून शेतकर्‍यांना १०० टक्क्यांपर्यंत अनुदानही दिले जात आहे.

ड्रोन तंत्रज्ञानाने एकावेळी खूप मोठ्या क्षेत्रावर फवारणी करता येते. त्यामुळे औषध आणि वेळ दोन्हीची बचत होईल. यापूर्वी शेतकर्‍यांना वेळेअभावी औषध फवारणी करता येत नव्हती. त्यामुळे पिकांमध्ये किडे शिरून पिकांची नासाडी होत असे, मात्र आता अधिक एकरांवर ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करता येते. ड्रोन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी

केंद्र सरकार ड्रोन खरेदीसाठी ४० ते १०० टक्के अनुदान देते. कृषी प्रशिक्षण संस्था, कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदी करण्यासाठी १०० टक्के म्हणजेच कमाल १० लाखांपर्यंत अनुदान दिले जात आहे. त्याच वेळी, खरेदीवर शेतकरी उत्पादक संस्थांना ७५ टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. कृषी पदवीधर युवक, महिला शेतकरी ड्रोन खरेदीवर ५० टक्के पर्यंत अनुदानासाठी पात्र आहेत. त्यांना कमाल ५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर इतर शेतकर्‍यांना ड्रोन खरेदीसाठी ४० टक्के म्हणजेच ४ लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.

Exit mobile version