३८ साखर कारखान्यांना ३८ कोटींचा दंड, जाणून घ्या कारण…

पुणे : गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी राज्यातील १४६ साखर कारखान्यांनी थकित एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना अदा केली होती. तर ज्या साखर कारखान्याकडे थकबाकी आहे अशा साखर कारखान्यांनी ती रक्कम अदा करुनच साखर कारखाने सुरु करावेत असे निर्देश राज्य शासनातर्फे देण्यात आले होते. मात्र, काही साखर कारखान्यांनी थकीत एफआरपी न देता किंवा कारखाने सुरु करण्यापूर्वीची प्रक्रिया पूर्ण न करता साखर कारखाने सुरु केले. अशा ३८ कारखान्यांवर कारवाई करुन ३८ कोटी रुपये दंड ठोठावण्यात करण्यात आला आहे.

राज्यातील १४६ साखर कारखान्यांनी एफएआरपीची १०० टक्के रक्कम शेतकर्‍यांना दिली आहे. ज्या कारखान्यांनी शेतकर्‍यांची एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना पूर्णत्वाने दिली ते कारखाने सोडून इतर कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे टप्प्याटप्प्याने राज्यातील साखऱ कारखाने हे सुरु झाले होते. पण आता ऐन हंगाम जोमात असतानाच राज्यात ३८ साखर कारखाने हे विनापरवानाच सुरु असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून ३८ कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे.

Exit mobile version