कपाशीवरील रोग व्यवस्थापन कसे करावे; हा आहे कृषी विभागाचा सल्ला

cotton

नाशिक : महाराष्ट्रात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यात जळगाव जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. मात्र दरवर्षी कापसावर विविध किडरोगांचा प्रादूर्भाव होत असल्याने उत्पादनात मोठी घट होते. यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. कापसावर पडणार्‍या किडरोगांनुसार त्याचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत कृषी विभागाने काही सल्ले दिले आहेत. त्याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कवडी रोग : १२५० ग्रॅम (०.२५ टक्के तिव्रतेचे) कॉपर ऑक्सीक्‍लोराईड ५०० लिटर पाण्यात (२५ ग्रॅम/१० लिटर पाणी) अथवा १२५० ग्रॅम झायनेब ५०० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार दोन ते तीन वेळा फवारावे.

दहिया रोग : प्रादुर्भाव दिसून येताच ३०० मेश पोताची गंधक भुकटीची हेक्यरी २० कि.ग्रॅ. या प्रमाणात धुरळणी करावी किंवा काबॅन्डॅझीम या बुरशीनाशकाची १० ग्रॅम/ १० लिटर पाणी (०.१ टक्के तिव्रतेची) किंवा पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारावे. पेरणीनंतर ३०,६० व ९० दिवसांनी फवारणी केल्यास रोगाचा चांगला प्रतिबंध होतो.

मर रोग : पेरणीपूर्वी बियाणास १.५ ग्रॅम कार्बन्डॅझीम अधिक ३ ग्रॅम थायरम प्रति किलो या प्रमाणात चोळावे.

पानावरील ठिपके /अल्टरनेरिया करपा : पेरणीपूर्वी बियाणास सुडोमोनास फ्लुरोसन्स १० ग्रॅम बियाणे प्रति कि.ग्रॅम या प्रमाणे जैविक बीजप्रक्रिया करावी. सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविकाची (०.२ टक्के) फवारणी पेरणीनंतर ३०,६० व ९० दिवसांनी करावी.

मुळकुज : पेरणीपूर्वी बियाणास थायरम ३ ग्रॅम किंवा कॅप्टन द्यावे. पाते, फुले व बोंड लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास पाते फुले व बोंडे गळण्याची शक्यता असते. पाते लागणे, फुले लागणे, बोंडे लागणे व बोंडे फुटणे या पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था आहेत. या पीक वाढीच्या अवस्थेवेळी पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. झाडावरील ३० ते ४० टक्के बोंडे फुटल्यानंतर पाणी देणे बंद करावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याची जवळपास ५० टक्के बचत होते. त्याचबरोबर उत्पादनामध्ये ३५ ते ४० टक्के वाढ होते. कपाशीच्या धाग्याचा गुणधर्मामध्ये सुधारणा होते. कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाचा ताण असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. अशावेळी एक सरी आड या प्रमाणे पाणी दिल्यास उपलब्ध पाण्यामध्ये अधिक क्षेत्रास संरक्षित सिंचन देणे शक्य होते.
३ ग्रॅम अधिक १ ग्रॅम काबॅन्डॅझीम प्रति कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

पानावरील कोणाकार करपा/ठिपके : पेरणीपूर्वी बियाणास कार्बन्डॅझीम अधिक थायरम ३ ग्रॅम प्रति किलो १:२ या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. पिकावर रोग दिसून येताच कपाशीवर कॉपर ऑक्सीक्‍लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने ३-४ फवारण्या कराव्यात.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Exit mobile version