उन्हाळी मूग लागवडीसाठी ‘हा’ आहे कृषितज्ञांचा सल्ला

mung

नागपूर : उन्हाळ्यातील वातावरण हे मूग लागवडीसाठी पोषक मानले जात असल्याने अनेक शेतकरी रब्बी हंगामानंतर उन्हाळी मूग लागवडीचा प्रयोग करतात. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड फायदेशीर ठरते. मूग पीक साधारण ६० ते ६५ दिवसांत पक्व होते. या काळात पाण्याच्या किमान ५ ते ६ पाळ्या देणे गरजेचे आहे.

मूग पेरणी फेब्रवारीच्या शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवड्यात करता येणार आहे. पेरणी तिफणीच्या साहयाने करुन दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी ठेवावे लागणार आहे. एकरी ५ ते ६ किलो बियाणे पुरेसे असते. मूग पेरणी करताना मध्यम ते चांगल्या प्रतीची शेतजमिन असणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा होणारी जमिन आवश्यक आहे. पाण्याची साठवणूक होत असलेल्या जमिनीत पेरा झाला तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमिनीची निवड करणे गरजेचे आहे.

खताचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने केल्यास उत्पादनात वाढ होत असते. यामुळे तज्ञांच्या मते, पूर्वमशागती वेळी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट हेक्टरी १० ते १५ गाड्या टाकावे लागणार आहे. लागवडीवेळी एकरी ८ किलो नत्र आणि स्फुरद १६ किलो याप्रमाणे खतमात्रा द्यावी लागणार आहे. पीक फुलोर्‍यात असताना २ टक्के युरिया २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. शेंगा भरत असताना, २ टक्के डीएपी २० ग्रॅम प्रतिलिटर पाणी फवारणी करावी लागणार आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version