५ जी तंत्रज्ञानामुळे घडणार कृषीक्रांती; हे होतील क्रांतीकारी बदल

5G technology

पुणे : अलीकडच्या काही वर्षांमध्ये कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. येणारा काळ हा अ‍ॅग्रोटेकचा असणार आहे. यामुळेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अ‍ॅग्रोटेक स्टार्टअपसाठी अनेक सवलतींचा वर्षाव केला आहे. अ‍ॅग्रोटेकचा स्पीड अनेक पटींनी वाढणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, ५ जी टेक्नोलॉजी!

एका अहवालानुसार, दूरसंचार विभाग आणि दळणवळण मंत्रालय कृषी क्षेत्रात ५जी तंत्रज्ञानाच्या वापराच्या शक्यता तपासत आहे. ५जी तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडू शकतात, यावर कृषी क्षेत्रातील अनेक तज्ञांचे एकमत आहे. ५ जी टक्नोलॉजीमुळे प्रामुख्याने सिंचन, मोबाईलबेस अ‍ॅप्लीकेशन्स, ऑटोमेशन टेक्नोलॉजी आदी बाबतीत मोठे बदल घडू शकतात.

१) सिंचन :
सिंचन अर्थात इरिगेशनचे महत्व अनेक शेतकर्‍यांना आता पटले असल्याने, याचा मोठा वापर होत आहे. यातील तंत्रज्ञान देखील दिवसेंदिवस प्रगत होत असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर पडत आहे. ५ जी तंत्रज्ञानाच्य वापरामुळे सिंचनाबाबतील मोठे क्रांतीकारी बदल घडू शकतात. मातीत पुरलेल्या ‘सॉईल प्रोब’चा आणि ५जी कनेक्टीव्हीटीचा एकत्र वापर करता येऊ शकतो. या उपकरणांमध्ये आर्द्रता, मातीचे नमुने आणि क्षारता यासारखा डेटा कॅप्चर करण्याची क्षमता आहे. यामुळं शेतकर्‍याला त्याच्या पिकांच्या स्थितीची अचूक माहिती मिळेल.

२) मोबाईल अ‍ॅप्लीकेशन्स :
अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने विविध अ‍ॅप्लीकेशन्सच्या मदतीने सर्व माहिती व तंत्रज्ञान एका क्‍लिकवर आले आहे. ५जी टेक्नोलॉजीनंतर शेतकर्‍यांना हवामान, पाऊस आणि या क्षेत्राशी संबंधित इतर महत्त्वाचा रीअल-टाइम डेटा देऊ शकतात. यासह बाजारभावासह बियाणं, किटकनाशकांच्या सध्याच्या किमती आणि त्यांच्या उत्पादनाचं बाजारमूल्यदेखील सहज कळू शकेल.

३) आर्टिफिशियल इंटेलिजन्स :
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सध्या परवलीचा शब्द झाला असला तरी याचा वापर अद्यापही मर्यादित क्षेत्रात होत आहे. ५जी तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढू शकतो. यामुळे मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटून यांत्रिकरणाचा वापर वाढू शकतो. यामुळे खर्‍या अर्थाने स्मार्ट शेती करणे शक्य होईल.

हे देखील वाचा :

Exit mobile version