यू-ट्यूबवर पाहून केली अफूची शेती; पोलिसांनी जप्त केले एक हजार गोण्या भरून पीक

Poppy-cultivation

जळगाव : सोशल मीडियाचा वापर कोण कसा करतो? याचा काही नेम नाही. एका तरुणाने यू-ट्यूबवर पाहून अफूची शेती केली. अफूचे पीक पूर्णपणे तयार झाले होते आणि पुढील १५ दिवसात या पिकाची कापणी करण्याचे नियोजन असताच पोलिसांनी कारवाई केली. अफूचे पीक काढण्यासाठी पोलीस व मजूरांना तीन दिवस लागले. त्यानंतर पोलिसांनी तब्बल एक हजार गोण्या जप्त केले. याची किंमत कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या तालुक्यातील वाळकी येथे संशयित प्रकाश सुदाम पाटील या तरुणाकडे सहा एकर शेती आहे. परंतु सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला होता. अशातच प्रकाशने यू-ट्यूबवरून अफूची शेती कशी करता येईल? याचे धडे घेतले. यानंतर त्याने जवळपास सहा एकर क्षेत्रात अफूची लागवड केली. याबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने आजूबाजूला मकेचं पीक घेतलं.

दरम्यान, स्थानिक पातळीवरून या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पथकासह स्वत: जात कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार, प्रकाश पाटील या तरुणाने साधारण डिसेंबर महिन्यात अफू पेरला होता. त्यामुळे अफूचे पीक आता पूर्णपणे तयार झाले होते आणि पुढील १५ दिवसात या पिकाची कापणी करण्याचं प्रकाशचं नियोजन होतं. परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई केली.

मजूर व पोलीस मिळून हे पीक काढण्यात आले असून त्याला तीन दिवस लागले. त्यातून हजारापेक्षा जास्त गोण्या भरण्यात आल्या आहेत. सततच्या नापिकीमुळे आपण अफूची शेती केल्याचे प्रकाशने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी प्रकाशला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version