थंड नव्हे उष्ण भागात घेतले संफरचंदाचे पिकं; जाणून घ्या प्रगतीशिल शेतकर्‍याचा धाडसी प्रयोग

apple cultivation in vidarbha with onion crop

वाशिम : सफरचंदाचे पिकं म्हटले की, हिमाचल, काश्मीर सारखे थंड हवेची ठिकाणं डोळ्यासमोर येतात. मात्र विदर्भाच्या रखरखत्या उन्हात सफरचंदाची कुणी लागवड केली आहे, असे कुणी म्हटल्याच विश्‍वास बसणार नाही.

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील चहल गावच्या शिवारात ३५ एकरात प्रविण ठाकरे नामक प्रगतीशिल शेतकर्‍याने फळबागेचा यशस्वी प्रयोग केला आहे. या फळबागेत सीताफळ, आंबा, संत्रा, नारळ, चिक्कू, स्ट्रॉबेरी, टरबूज अशी फळपीकं ते घेत आहेत. दोन वर्षापूर्वी नवा प्रयोग म्हणून त्यांनी सफरचंदाचीही लागवड केली. आता एप्रिलच्या या कडक उन्हात त्याला फळधारणा होतेय.

प्रवीण ठाकरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसयात अमूलाग्र बदल केला आहे. त्यांची शेती कोरडवाहू भागात असतांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व उत्तम नियोजन करत त्यांनी आपली ३५ एकर शेती हिरवीगार केलीय. पिकाला पाणी देण्यासाठी सम्पूर्ण ऑटोमेशन सिस्टीम बसवली आहे. याच नियोजनाद्वारे फळझाडांना खतंही दिली जातात. ज्यामुळे पाणी, खत आणि वेळीचीही बचत होते. त्यांच्या कोरडवाहू जमिनीवर आज सीताफळ, आंबा, संत्री, नारळ, चिकू, स्ट्रॉबेरी, हंगामी कलिंगड अशी एक ना अनेक फळपिके बहरत आहेत. यातून यंदा लाखोचे उत्पादन मिळेल असा त्यांचा दावा आहे.

हे पण वाचा :

Exit mobile version