ठिबक सिंचनाच्या मदतीने वाढवा कांद्याचे उत्पादन, वाचा सविस्तर

नाशिक : कांदा पिकामध्ये खत, कीड-रोग याबरोबरच आता सिंचन व्यवस्थापनही रुजत आहे. यापूर्वी रिकाम्या क्षेत्रावर गादी वाफे न करता कांदा लागवड केली जात होती. पण आता गादी वाफे तयार करुनच लागवड केली जात आहे. यामध्ये ठिबकच्या (Drip Irrigation) माध्यमातून पाण्याची तर बचत होतेच पण शेतकर्‍यांना श्रमही कमीच पडते. ठिबक सिंचनामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून उत्पादनात ही वाढ होते.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी यंदा प्रथमच उन्हाळी हंगामातील कांदा पीकाला फायदा होण्याची स्थिती दिसून येत आहे. यामुळे उन्हाळी कांद्यावर शेतकर्‍यांचा भर आहे. मात्र, या दरम्यान शेतकर्‍यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन ठिबकद्वारे केले तर अधिकचा फायदा होणार आहे. त्यामुळे ठिबक सिंचनाचे महत्व शेतकर्‍यांनी समजून घेतले पाहिजे.

असे आहेत ठिबक सिंचनाचे फायदे

ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय तर टळला जातोच पण पिकाला एकसारखे पाणी मिळते. यासह पिकाला विद्राव्य खते देता येत असल्याने लागवड क्षेत्र हे वाढवता येते. यामुळे एकरी उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी पाठाद्वारे पाणी न सोडता ठिबक सिंचनाचाच वापर करणे गरजेचे आहे. शिवाय काळाच्या ओघात आता मजूर टंचाई तर आहेच पण अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने ही ठिबक सिंचनाची पध्दतच शेतकर्‍यांच्या कामी येणार आहे.

ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान

ठिबक सिंचनासाठी शेतकर्‍यांना शासनातर्फे ८० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. याची प्रक्रिया करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी ऑनलाईन पोर्टल ओपन करावे. यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्‍लिक करावे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्‍लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करावा. यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरावी. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडावा.

यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे. ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे. यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्‍लिक करावे. मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्‍लिक करावे. यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल. यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ रुपये ६० पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे.

Exit mobile version