हे आहेत माती परिक्षणाचे फायदे…

soil-testing-mati-parikshan

माती परीक्षण

नागपूर : जमीनीचा पोत कमी झाल्यामुळे उत्पादनावर होणार्‍या परिणामांवर नेहमीच चर्चा होत असते. यास काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित कारणे आहेत. पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे जमीनीचा पोत कमी होत आहे. यासाठी शेतकऱ्यांना माती परिक्षण करुन पिकं घेण्याचा सल्ला कृषीतज्ञांकडून दिला जातो. शेतातील मातीच्या नमुन्यांचे भौतिक, रासायनिक जैविक पृथक्करण करून त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपसाणे हे महत्वाचे असते. यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावे त्याचा किती उतार पडेल या सर्व बाबींचा अंदाज यामधून बांधता येतो.

मातीचा नमुना स्वच्छ कापडी पिशवीत भरून प्रयोगशाळेकडे पृथक्करणासाठी पाठवावा लागतो. त्याबरोबर शेतकऱ्यांचे नाव व पत्ता, नमुना घेतल्याची तारीख व नमुना घेतलेल्या जमिनीची खोली, गट नंबर व एकुण क्षेत्र, जमिनीचा प्रकार व खोली, मागील हंगामात घेतलेले पीक व पुढील हंगामात घेण्याचे पीक व जात याची माहितीही देणे आवश्यक असते.

मातीचा नमुना घेण्याची पद्धत

शेतातील मातीचा नमुना योग्य पद्धतीने घेणे ही माती परीक्षण कार्यक्रमात सर्वात महत्वाची बाब आहे. मातीच्या नमुन्याचे पृथक्करण अत्याधुनिक उपकरणाद्वारे केले जाते. मातीचा नमुना जर त्या शेताचा प्रतिनिधीक नमुने कधीही काढता येतात. मात्र, पाऊस पडल्यानंतर, पाणी दिल्यानंतर आणि वाफसा नसताना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुने काढु नयेत. जमिनीत पीक घेण्याच्या हंगामापुर्वी नमुने घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी कोणते अन्नद्रव्य ही शेतजमिनीत आहेत हे समजणार आहे.

मातीचा नमुना काढताना घ्यावयाची काळजी

हे देखील वाचा :

Exit mobile version