पपई उत्पादक शेतकऱ्यांसमोर ही आहे मोठी अडचण; ‘हा’ आहे तज्ञांचा सल्ला

Papaya

जळगाव : रब्बी हंगामातील पपई अंतिम टप्प्यात असतानाच वाढत्या तापमानामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे शिवाय पानगळही होत आहे. वर्षभर केवळ पदरी नुकसानच पडत असल्याने अनेक शेतकरी हे पपई बागा उद्ध्वस्त करीत असल्याचे चित्र आहे.

यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. यामधून पपई बागांचीही सुटका झाली नाही. अगोदर पावसामुळे रस शोषणार्‍या कीडीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पाने गुंडाळली गेली तर पपई बागांची अपेक्षित वाढच झाली नाही. तर आता अंतिम टप्यात होत असलेल्या नुकसानीमुळे उत्पादनात घट होणार आहे. मध्यंतरी व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये दरावरुन मतभेद होते. ते मिटले असून आता थेट उत्पादनाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

वाढते तापमान आणि विषाणूजन्य आजारांमुळे होणारी पानगळ मुळे दुहेरी संकटात पपई उत्पादक शेतकरी सापडला. विषाणू जन्य आजारांमुळे पानगळ तर वाढत्या तापमानात पपई ची फळे पिवळे पडत आसल्याने शेतकर्‍याचा बागा उद्ध्वस्त होत आहेत. अशा परिस्थितीत जेथे पपईचे जास्त नुकसान झालेले नाही तेथे शेतकर्‍यांनी पपईला अवरण घालावे. शेतकर्‍यांनी पपई बचावासाठी गोणपाटाचा वापर करुन फळ सुरक्षित ठेवणे हाच पर्याय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version