कृषी क्षेत्रातील करिअर

पुणे : कृषी क्षेत्राकडे एक उद्योग किंवा व्यवसाय म्हणून पाहण्याचा नवा दृष्टीकोन अलीकडच्या काळात निर्माण होतांना दिसत आहे. कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. हा नियम कृषी क्षेत्रालाही अपवाद नाही. कृषी क्षेत्रासाठी प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी देशात ५३ कृषी विद्यापीठे, पाच अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय कृषी विद्यापीठ आणि चार केंद्रीय विद्यापीठे कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त काही शिक्षण, प्रशिक्षण संस्थाही या क्षेत्रात पुढे आल्याने पारंपारिक शिक्षणाची वाट सोडून अनेकांनी या क्षेत्रात करिअर करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. याकरीता कृषी क्षेत्रा करिअर करण्याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कृषि विद्यापीठे

  1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर
  2. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी नगर, अकोला
  3. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, बासमत रोड, कृषीनगर, परभणी  
  4. डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी

कृषी क्षेत्रात डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तरसह थेट पीएच.डी. पर्यंत शिक्षण घेता येते. कृषी पदविका ही कृषी विद्यालयातून दिले जाते.

राज्यातील कृषी विषयातील उपलब्ध अभ्यासक्रम

कृषी, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान, वनिकी, पशुसंवर्धन हे होत.

या आहेत करिअरच्या संधी

कृषी पदवीधारकांना कृषी विद्यापीठांतर्गत पदवी-पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये व्याख्याता, कृषी तंत्रनिकेतन, कृषी तंत्र विद्यालयांमध्ये शिक्षक हे पद मिळू शकते. कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ या पदावर तसेच कृषी विस्तार कार्य करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रांवर शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतात. राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये विविध पदांवर काम करण्याची संधीही उपलब्ध आहे.

याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यामध्येही विविध पदांवर कृषी अधिकारी, ग्रामसेवक या पदांवर काम करण्याच्या संधी या पदवीधारकांना उपलब्ध आहेत. कृषी पदवीधरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्यासुद्धा संधी करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बँका, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्त, कॉर्पोरेशन, बहुराष्ट्रीय कंपन्या व कृषी आयात-निर्यातीमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधर विविध उद्योग स्थापन करू शकतात.

Exit mobile version