शेतकऱ्याने काढलेले हे व्यंगचित्र होतेय व्हायरल… वाईनशी आहे संबंध; वाचा सविस्तर

नाशिक : किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावरुन गदारोळ सुरु असतांना आता वाईन निर्मिती संबंधी एका शेतकर्‍याने काढलेले एक चित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यावर अनेक युजर्स मजेशिर कमेंट्स करत असले तरी या व्यंगचित्राच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा मार्मिकरित्या दाखविण्यात आली आहे.

व्हायरल होत असलेल्या कार्टुनमध्ये एक शेतकरी कृषीमंत्री दादा भुसे यांना एक निवेदन देत असून ‘कांद्याची पण बनवा वाईन, कांदा उत्पादक सुजलाम सुफलाम होईन’, असे त्यात म्हटले आहे. त्या शेतकर्‍याचे शिर म्हणजे कांदा दाखविण्यात आला असून त्यामागे शेतकरी उभे असलेले दिसत आहेत.

हे देखील वाचा : किराणा दुकानात दारु विकून खरचं शेतकऱ्यांचा फायदा होईल का?

नाशिकच्या सटाणा येथील शेतकरी आणि कार्टुनिस्ट संजय मोरे यांनी ही कविता केली आहे. ज्यात त्यांनी कांद्यापासून वाईन तयार केली. तर कांदा उत्पादक शेतकर्‍याला त्याचा फायदा होईल, अशी व्यंगत्मातक मागणीही केली आहे.

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन घेतले जाते. द्राक्षपासून वाईन तयार केली जाते. द्राक्षाचाच न्याय कांद्याला देखील मिळावा, अशी मागणी या शेतकर्‍याने कवितेच्या माध्यमातून केल्याने सध्या हे कार्टुन आणि कविता सगळीकडे व्हायरल होत आहे.

Exit mobile version