या नगदी पिकाने बदलले आदिवासी शेतकऱ्यांचे जीवन

india-tribal-farmers

नाशिक : पूर्वीपासून पावसावर अवलंबून असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या आदिवासी तालुक्यात भात, नागली, वरई, घेवडा, टोमॅटो, हरभरा आदी पिकांची शेती केली जात असे मात्र गत काही वर्षांमध्ये अनेक शेतकरी स्ट्रॉबेरी या नगदी पिकांकडे वळले आहेत. स्ट्रॉबेरी या नगदी पिकामुळे एकरी दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याने या भागातील आदिवासी शेतकर्‍यांच्या हातात पैसा खेळू लागला आहे.

अतिदुर्गम आदिवसी तालुका म्हणून सुरगाणा तालुक्याची ओळख. मात्र, गेल्या चार- पाच वर्षांपासून स्ट्रॉबेरीचे माहेरघर म्हणून या तालुक्याची ओळख निर्माण होऊ लागली आहे. २०१७-१८ मध्ये तालुक्यातील घाटमाथ्यावरील आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणे सुरू केले. त्यावेळी अवघ्या ७५ हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड होती.

स्ट्रॉबेरी लागवडीतून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने आदिवासी बांधवांचा कल स्ट्रॉबेरीकडे वाढल्याने लागवड क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये तालुक्यातील १४६ हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. खर्च वजा जाता शेतकर्‍यांना एकरी दोन ते तीन लाखांचे उत्पन्न मिळू लागले आहे.

स्ट्रॉबेरी लागवडीसाठी जमीन ही हलक्या प्रतीची व हवामान थंड लागते. या परिसरातील हवामान लागवडीसाठी योग्य आहे. त्यामुळे लागवड क्षेत्रही वाढले आहे. शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती विकसित करत आहेत. या भागात ईटर, डाऊन, एस ए, आर – १, स्वीट, चार्ली, सेलवा, राणी, नाभीया, ईटर प्लस, एससी, कालिदा, मरूना या जातीची लागवड केली जाते.

हे देखील वाचा :

Exit mobile version