शेती अवजारे घेण्यासाठी मिळणार ५० ते ८० टक्के अनुदान; अशी आहे केंद्र सरकारची ‘स्माम’ योजना

central government Smam scheme

पुणे : वाढत्या महागाईचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे, यास शेतीही अपवाद नाही. बियाण्यांपासून खते, किटकनाशकांपासून शेती अवजारांच्या किंमती मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. महागडी कृषी अवजारे घेणे शेतकर्‍यांना परवडत नसल्याने शेतकर्‍यांना शेती अवाजरे घेण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘स्माम’ (Smam Scheme) या योजनेच्या माध्यमातून ५० ते ८० टक्के अनुदान दिले जाते. मात्र अनेक शेतकर्‍यांना या अत्यंत फायदेशीर योजनेची माहितीच नाही.

यासाठी केवळ सातबारा नावावर असणे गरजेचे आहे. यामुळे शेतामध्ये जे उपकरणे वापरतो ती उपकरणे खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांना ५० ते ८० टक्केपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. शेती व्यवसायात विकते उपकरणे घेऊन उत्पादन वाढविणे शेतकर्‍यांना शक्य नसल्याने केंद्रातर्फे ही योजना राबविली जात आहे.

लाभ घेण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा, आधार कार्ड, राहण्याचे प्रमाणपत्र, ८ ‘अ’, बँक पासबूक, मोबाईल नंबर, जातीचा दाखला आणि पासपोर्ट साईजचा फोटो अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

असा घ्या योजनेचा लाभ

स्माम या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करावे लागणार आहे

याठिकाणी Registration असा पर्याय समोर येईल. तेव्हा त्यामध्ये शेतकरी (Farmer) हा पर्याय निवडावा लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज समोर येईल.

या पेजवर नोंदणी करावी लागणार आहे.

यामध्ये तुमते नाव, आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे.

त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.

अखेर Submit यावर क्लिक केल्यावर तुमची नोंदणी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण होईल.

हे पण वाचा :

Exit mobile version