शेती आणि शेतीसबंधी सर्व माहिती मिळवा एका क्‍लिकवर.. असे आहे केंद्र सरकारचे ‘सुपर अ‍ॅप’

super app farmer

पुणे : शेतकर्‍यांना पीक पेरणी, मशागत, उत्पादन, काढणी पश्चात त्याचे व्यवस्थापन एवढेच नाही तर हवामान आणि बाजारपेठेची माहिती एकाच ठिकाणी देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘सुपर अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे. सर्व माहिती एका क्‍लिकवर शेतकर्‍यांना देण्याचा प्रयत्न या अद्यावत अ‍ॅपच्या माध्यमातून केला जाणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

या अ‍ॅपमध्ये हवामान, बाजारपेठेचे अपडेट्स, सरकारी योजना, कृषी सेवा आणि देशाच्या विविध भागांसाठी जारी केल्या जाणार्‍या कृषी विषयक सल्ल्याची माहिती व नवीन संशोधन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अहवालानुसार, किसान सुविधा, पुसा कृषी, एमकिसन, शेटकरी मासिक अँड्रॉइड अ‍ॅप, फार्म-ओ-पेडिया, पीक विमा अँड्रॉइड अ‍ॅप, कृषी बाजार, इफको किसान आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कृषी ज्ञान यांचे एकत्रीकरण करून एकच अ‍ॅप तयार करण्याच्या योजनेवर कृषी मंत्रालय काम करत आहे.

याबरोबरच आयसीएआर आणि त्याच्याशी संलग्न संस्था, राज्य कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि इतर विभाग अशा सरकारी संस्थांच्या शेतकर्‍यांसाठीचे सुपर अ‍ॅपमध्ये विलीन करण्यात येणार आहे. सुपर अ‍ॅपच्या प्रगतीबाबत नुकतेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. येत्या काही आठवड्यांत हे अ‍ॅप लाँच होऊ शकते.

हे पण वाचा :

Exit mobile version