शेतीमाल सातासमुद्रापार पोहचवायचा असेल तर शेतकर्‍यांसाठी आहे केंद्र सरकारची उडान योजना; जाणून घ्या सविस्तर

Success farmer

मुंबई : अलीकडच्या काळात शेतीत नवनवे प्रयोग करुन घेतलेला शेतीमाल परदेशात पाठविणार्‍या प्रगतिशिल शेतकर्‍यांची संख्या वाढली आहे. मात्र याची माहिती ठराविक शेतकर्‍यांपर्यंतच मर्यादित असल्याने बहुसंख्य शेतकरी त्यांचा दर्जेदार शेतमाल विक्रीसाठी परदेशात पाठवू शकत नाही. या समस्येवर तोडगा काढत केंद्र सरकारने उडान योजना सुरु केली असून यामाध्यमातून शेतकर्‍यांना थेट परदेशातील बाजारपेठेत एंट्री मिळणार आहे.

सन २०२० मध्ये कृषी उडान योजना सुरु करण्यात आली होती. त्याला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. ज्यामुळे नाशवंत शेतीमालाची वाहतूक ही वेळीच करणे शक्य झाले आहे. देशातून शेतीमालाची योग्य पध्दतीने वाहतूक व्हावी या दृष्टीने विमानातील निम्या जागा आरक्षित करुन याकरिता अनुदानही दिले जात आहे. यामध्यमातून मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस यासारख्या व्यवसयासंबधीची वाहतूक करणे सोपे होणार आहे.

कृषी उडान योजनेमध्ये नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण विभाग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, आदिवासी व्यवहार मंत्रालय, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय यांचा समावेश आहे. देशभरातील ५३ विमानतळे ही या योजनेसाठी जोडण्यात आली आहेत.

योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक निकष व कागदपत्रे

१) भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
२) अर्जदार शेतकरी असावा, तरच त्याला हा फायदा होईल.
३) अर्जासाठी आवश्यक आधार कार्ड
४) अर्जदाराला शेतीशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील
५) अर्जदाराने निवास प्रमाणपत्र दाखवायलाच हवे.
६) दोन उत्पन्न प्रमाणपत्रातही अर्जदार दाखवू शकतो.
७) रेशन कार्ड.
८) मोबाइल क्रमांक आदी बाबींची आवश्यकता आहे.

हे पण वाचा :

Exit mobile version