डाळिंब बागा नष्ट होण्याची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे; केंद्रीय पथकाचा अभ्यास

Pomegranate

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सांगोला आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांमध्ये डाळिंबाचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकाने थेट बांधावर जाऊन डाळिंब बागांची पाहणी केली.

खोड किडीचा तर प्रादुर्भाव आहेच पण बदलत्या वातावरणामुळे शेतकर्‍यांना बागांचे व्यवस्थापन करता आले नाही. यामध्येच अधिकचे नुकसान हे झाले असल्याचे नवी दिल्ली येथील तज्ञांच्या केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आले आहे.

तेल्या रोगावर तर अद्यापर्यंत प्रभावी औषेधच नाही. तर दुसरीकडे खोड कीड ही वर्षभर डाळिंबाच्या बागेतच सक्रिय असते. मात्र, यंदा अधिकचा पाऊस झाल्याने या कीडीचा प्रादुर्भाव अधिक झाला. शिवाय सातत्याने बदलत असलेल्या वातारणामुळे शेतकर्‍यांना योग्य व्यवस्थापनही करता आले नाही.

कीड रोग नियंत्रण व त्याचे व्यवस्थापन हे वेळेत न झाल्याने खोडकीडीची वाढ होण्यास पोषक वातावरण झाले अन् त्याचा उत्पादनावर पर्यायाने बागांवरदेखील परिणाम झाला असल्याचे पथकातील सहसंचालक डॉ. किरण दशेकर यांनी सांगितले.

हा आहे केंद्रीय पथकाचा सल्ला

डाळिंबावर किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्यास त्यामुळे शेतकर्‍यांनी प्रति लिटर पाण्यात इमामेक्टीन बेंजोएट २ ग्रम, प्रोपिकॉननाझोल २ मिली एकत्र मिसळून फवारणी करावी लागणार आहे. बहार धरण्यापूर्वी जमिनीपासून दोन फुटांपर्यंत खोडांसह फांदीवर १० लिटर पाण्यामध्ये लाल माती चार किलो,इमामेक्टीन बेंजोएट २० मिली, कॉपर ऑक्सिकलोराईड २५ ग्रॅम एकत्रित करुन खोडाला लेप द्यावा लागणार आहे. तसेच १० टक्के बोर्डो मिश्रणाचा लेप आलटून-पालटून वापरण्याचा सल्ला कीटक शास्त्रज्ञ डॉ. राघवेंद्र देवरमनी यांनी दिला आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version