नैसर्गिक नंतर आता शेतकऱ्यांवर ‘रासायनिक’ संकट!

Chemical-fertilizers-price-hike

नाशिक : खरिप हंगामात झालेली अतिवृष्टी, पूर, वादळ यातून कसे बसे सावरल्यानंतर रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळेही प्रचंड नुकसान झाले. निसर्गाच्या या तडाख्यात सावरत असतांना शेतकऱ्यांना आता रासायनिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या पंधरा वीस दिवसात रासायनिक खतांच्या किमतीत २०० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यत वाढ झाली आहे. खतांना करिता लागणारे गॅस ,फॉस्फेट, सल्फ्यूरिक सिड या कच्च्या मालाच्या किमती वाढ झाल्यामुळे खतांच्या देखील वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

रासायनिक खताच्या दरात वाढ झाल्याने आता पिके जोपासायची कशी असा सवाल आहे. सध्या कोरोनाच्या ओमियोक्रॉन व्हेरिअंटचे संकट घोंगावत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होण्याची शक्यता असून यात कृषी क्षेत्राला ही फटका बसू शकतो. यामुळे शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचे नियोजन जपून करावे, असे आवाहन या क्षेत्रातील तज्ञांनी केले आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version