निसर्गाच्या लहरीपणानंतर आता शेतकऱ्यांना सतावतेय ही चिंता

नाशिक : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामातही शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. आधीत शेतकरी रडकुंडीला आला असतांना आता शेतकर्‍यांना नव्या संकाटाला सामोरे जावे लागत आहे. ते म्हणजे, खत टंचाईचे!

रब्बी हंगामातील पिकांची वाढ होण्यासाठी १०:२६:२६ या खताची मागणी होत आहे. मात्र, याचीच टंचाई असल्याचे शेतकर्‍यांना सांगितले जात आहे. शिवाय काही विक्रेत्यांकडून तर हे खत मिळेल पण त्या जोडीला अन्य खतांची खरेदी करण्याची अट घालत आहेत. यामुळे शेतकर्‍यांना अर्थिक झळ सोसावी लागत आहे.

कृषी खात्यानेच आता खताचा पुरवठा होईल यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने विभागीय कृषी कार्यालयालाच घेराव घातला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version