अशा पद्धतीने करा हरभरा पिकावरील घाटे अळी कीड व रोग नियंत्रण

harbhara

नागपूर : हरभरा पिकावर कीड किंवा रोगांचा तेप्रादुर्भाव नेहमीच पाहायला मिळतो त्यापैकी घाटेअळी हरभऱ्यावरील मुख्य कीड आहे ही कीड हरभरा व्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफूल, टोमॅटो, भेंडी, कापूस, ज्वारी, वाटाणा इत्यादी पिकांवर नेहमीच पाहायला मिळते. घाटे अडी वर्षभरही शेतात वास्तव्यात असते यासाठी साधा उपाय म्हणून शेतामध्ये पंधरा ते वीस कामगंध सापळे लावावेत
त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग ओढले जाऊन पुढील प्रजननास आळा येतो अडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. हरभरा पिकावरील अळी खाण्यात काही मित्र पक्षीही आपली भूमिका बजावतात म्हणून त्यासाठी शेतामध्ये काठ्या लावून ठेवाव्यात पक्षी काठीवर बसतील आणि अळ्यांना टिपण्यास त्यांना सोपे जाईल.

कृत्रिम उपायांनी कीड नियंत्रण प्रभावीपणे करता येते कीटकनाशकाचा सारखा सारखा वापर न करताणा अदलुन बदलुन औषधे फवारावी हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी यासाठी पाच किलो निंबोळी अर्क व दहा लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी कापडाच्या साह्याने त्याचा रस काढावा आणि त्यामध्ये आणखी 90 लिटर पाणी टाकावे.व ते फवारणी करावी अशाप्रकारे किडीचे वस्थापन करून शेतकरी आपल्या येणाऱ्या अनाथ उत्पन्नात वाढ करू शकतात.

घाटेअळी :
ही अळी अमेरीकन बोंड अळी, हिरवी बोंड अळी, हरभऱ्यावरील घाटे अळी व तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी अशा विविध नावांनी ओळखली जाते. पूर्ण विकसित घाटे अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात) व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.

नुकसान :
लहान अळ्या सुरवातीस पानावरील आवरण खरडून खातात. अशी पाने काही अंशी जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. विकसित घाटे अळी कळ्या व फुले कुरतडून खातात. पूर्ण वाढ झालेली अवस्था तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते.

घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण :
उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी करावी. त्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात, तसेच उन्हामुळे मरतात. वाणनिहाय शिफारशीत अंतरावर पेरणी करावी. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये ल्युरचा वापर करावा. शेतात हेक्‍टरी ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात दरहेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. पक्ष्यांमुळे अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी.

हरभरा या पिकात आंतरपिके :
हरभरा या पिकात शेतकर्‍यांनी सहा ओळी हरभऱ्याच्या व रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक घेता येते. तसेच उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर दहा सेंटिमीटर अंतरावर हरभऱ्याची एक पेरणी केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याच बरोबर हवेचा उपयोग करून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. हरभरा या पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुख्यता मोहरी ,करडई, ऊस अशी आंतरपिके घेऊन उत्पन्नात वाढ करू शकतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च व्यवस्थापन केल्यास हरभरा पीक शेतकऱ्यास उत्पन्नासाठी वरदान ठरू शकते.

हे देखील वाचा :

Exit mobile version