कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो हे वाचाच…

अकोला : कापसाला या वर्षी विक्रमी दर मिळेल अशी अशा आहे. बऱ्याच वर्षापासून कापसाला योग्य भाव मिळत नव्हता परंतु आता कापसाला प्रचंड भाव मिळेल अशी शक्यता वाटत आहे. हे कापसाचे दर का वाढणार आहेत. किती दरापर्यंत कापूस जावू शकेल हि आणि इतर महत्वाची माहिती आपण बघणार आहोत. मित्रांनो पुढील परिस्थिती काहीही असेल पण सध्या मात्र कापसाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.

शेती करत असतांना अनेक संकटांचा सामना शेतकरी बांधवाना करावा लागतो. शेतीसाठी लागणारे बियाणे, वाढलेले खतांचे दर, महागडी औषधी यामुळे शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढतो. एवढा खर्च करूनही नैसर्गिक संकटातून पिक वाचलेच तर त्याला योग्य भाव मिळत नाही परिणामी शेती तोट्यात येते. महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांचे मुख्य पिक आजही कापूस आहे त्यामुळे जर तुम्ही देखील कापसाचे पिक तुमच्या शेतात लावले असेल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे कारण कापसाला चांगला भाव मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

यंदाच्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळतो आहे. जानेवारी महिन्याच्या ४ तारखेपासून कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांचा भाव मिळायला सुरुवात झाली. आणि आता बघता बघता कापसाला ११ हजारांचा भाव मिळाला आहे. कापसाच्या उत्पादनातील घट आणि मागणीत झालेली वाढ ही कापसाच्या दरवाढीची मुख्य कारणे आहेत.

काही का असेना मात्र मोठ्या कष्टाने जगवलेल्या कापसाला चांगला भाव मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदाच्या खरिपात अतिवृष्टी आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावापासून मोठ्या कष्टाने कापसाचे पीक जगवले. त्याचे फलित म्हणून शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो आहे.

Exit mobile version