खरिपात खत टंचाईचे संकट; हे आहे कारण

urea-fertilizer

पुणेः रशिया युक्रेन युध्दामुळे जागतिक बाजारात खत दरात मोठी वाढ झाली असून, खतांचे दर दुप्पट झाले आहेत. खरिपात खते उपलब्ध करण्यासाठी आतापासूनच आयात करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.  

भारत संयुक्त खतांसाठी रशिया, बेलारूस आणि युक्रेनवर अवलंबून आहे. पोषण आधारित खतांच्या निर्मितीत रशिया पहिल्या चार देशांमध्ये येतो. तर नायट्रोजन आणि फॉस्फेट खते निर्मितीत रशिया चौथ्या क्रमांकावर आहे, तर पोटॅश निर्मितीत तिसऱ्या. बेलारुस दुसऱ्या स्थानवर येतो. भारताच्या एकूण आयातीपैकी या तिनही देशांचा वाटा जवळपास २० टक्क्यांपर्यंत आहे. देशात दरवर्षी जवळपास ७० ते ७२ लाख टन डीएपीची आयात होते. पोटॅश आयात ५० लाख टनांच्या दरम्यान राहते. ही आयात मुख्यतः बेलारुस आणि रशियातून केली जाते. तर रशिया डिएपी, एमओपी, एनपीके आणि युरिया आयात होते.  

खत उद्योगातील जाणकार विजयराव पाटील यांनी सांगितले की, खरिपासाठी  खते आणि कच्चा माल फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या देशांतून माल निघतो. देशात माल दाखल व्हायला किमान एक महिना लागतो. त्यानंतर प्रक्रिया होऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला किमान २ ते ३ महिने लागतात. परंतु सध्या व्यवहार ठप्प असल्यानं आयात थांबली. याचा परिणाम देशातील खत बाजारावर होण्याची शक्यता आहे.

भारत रशियामार्गे बेलारुसमधूनही पोटॅशची आयात करतो. रशिया आणि बेलारुसवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. परिणामी या देशांतून खत आयात पेमेंटच्या अडथळ्यामुळे ठप्प आहे. तर युध्दामुळे युक्रेनमधून निर्यात थांबली. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात पोटॅशसही संयुक्त खतांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version