रब्बी हंगामात कोरडवाहू क्षेत्रात अशा पध्दतीने करा पीक लागवड

Rabbi-season

पुणे : महाराष्ट्रात रब्बी हंगामामध्ये ज्वारी, करडई, हरभरा ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. तसेच मोहरी, जवस आणि सूर्यफूल ही पिके अल्प प्रमाणात घेतली जातात. आज आपण शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाच्या गप्पा मारत असलो तरी आजही रबी हंगामातील कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे सरासरी उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात वाढलेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आजही बरेचशे शेतकरी रब्बी हंगामातील पिकाची लागवड पारंपारिक पद्धतीने करतात. रब्बी हंगामातील कोरडवाहू क्षेत्रात घेण्यात येणार्‍या पिकांची योग्य निवड आणि त्यासाठी शिफारस केलेले लागवडीचे आधुनिक तंत्र अवलंबल्यास या पिकांचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी निश्चित मदत होऊ शकते.

रब्बी हंगामातील उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून काही शास्त्रोक्त तंत्र विचारात घेणे जरुरीचे आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये पाऊसमान समतोल राहिल्यास जमिनीमध्ये ओलावा चांगल्या प्रकारे साठवला जातो आणि पर्यायाने रब्बी हंगामातील पिके चांगले उत्पादन देतात. विदर्भ व मराठवाडा या भागात विशेषतः भारी जमिनीमध्ये अथवा ज्या जमिनीची जलधारणा शक्ती अधिक आहे अशा ठिकाणी रबी हंगामाची पिके घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने रबी ज्वारी, करडई, हरभरा ही पिके घेतात. विशेषतः भारी जमिनीमध्ये अथवा ज्या जमिनीची जलधारणा शक्ती अधिक आहे अशा ठिकाणी रबी हंगामाची पिके घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने रबी ज्वारी, करडई, हरभरा ही पिके घेतात.

सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक व धुळे यांचा पूर्व भाग व जळगाव, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद हा विभाग अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भागात पाऊस ४०० ते ७५० मि.मी. जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान पडतो. या विभागात ७० टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारीचे पीक घेतल्या जाते. त्याचबरोबर करडई आणि हरभरा ही पिके काही अंशी घेतले जातात. खरिपातील संकरित ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांमधील तणांचा बंदोबस्त योग्य वेळी केल्यास जमिनीमध्ये दीर्घकाळ ओलावा टिकून रब्बी हंगामातील दुबार पिकाचे उत्पादन अधिक मिळते. रब्बी हंगामातील महत्वाच्या पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करतांना यामध्ये मृद व जलसंधारण, पिकांच्या सुधारित जातींची निवड, वेळेवर मशागत व पेरणी, तणांचा बंदोबस्त, रासायनिक खतांचा समतोल वापर, गरजेनुसार पीक संरक्षण, ओलावा टिकविणे, आपत्कालीन पीक योजना व सुयोग्य व्यवस्थापन यांचा समावेश होतो.

आंतरपीक पद्धती :
१. रब्बी ज्वारी – करडई

ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रात रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. वातावरणातील उष्णतामानाच्या तफावतीमुळे ज्वारी अथवा करडई सलग पिकात येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते. ही आंतरपीक पद्धत ६:३ या ओळीच्या प्रमाणात शिफारस करण्यात आलेली आहे. इतर शिफारसी ज्वारीच्या सलग पीक पद्धती सारख्याच शिफारस करण्यात आलेल्या आहेत.
२. करडई + हरभरा:
मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. ४:५२ अथवा ६:३ ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास जास्त फायदा होतो.

Exit mobile version