खतरनाक : ‘या’ अत्याधुनिक चष्म्याने ओळखता येतील पिकांवर येवू शकणारे कीडरोग

Sophisticated glasses

ठाणे : पिकांची योग्य पध्दतीने निगा राखल्यानंतरही कीड आणि रोगांमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असते. हवामान बदल, पिकांची रोगप्रतिकारक शक्ती किंवा अन्य कारणांमुळे कीटकरोगांचा प्रादर्भाव वाढतो. पिकांवर पडणार्‍या या कीड आणि रोगांची माहिती शेतकर्‍यांना आधीच मिळाली तर योग्य उपाययोजना करत येवू शकतात. यासंबंधी आतापर्यंत केवळ ढोबळ अंदाज बांधून कीडरोगांवर भाष्य केले जात होते. मात्र आता तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, भविष्यात पिकांवर कोणत्या कीडरोगांचा प्रादूर्भाव होवू शकतो, हे ओळखण्याचे तंत्र विकसित झाले आहे.

महाराष्ट्रातील ठाण्यातील ‘इंडोसेपियन अ‍ॅग्रो टेक्नॉलॉजी’ या कृषी स्टार्टअप कंपनीने असे सेन्सर बेस्ड डिव्हाइस अर्थात उपकरण बनवले आहे, जे चष्म्यासारखे घातले जाते. ते परिधान केल्याने, शेतात निरीक्षण केल्याने कीड आणि रोगांची माहिती मिळते. या यंत्राद्वारे शेतकर्‍यांना केवळ पिकाची सद्यस्थितीच नाही तर पुढील १५ दिवसात पिकांना कोणत्या समस्या येऊ शकतात याची माहिती मिळते. एवढेच नाही तर हे उपकरण पिकाची सद्यस्थिती आणि भविष्यातील समस्या यावर आधारित सल्लाही जारी करते.

अनेक कृषी तज्ज्ञांनी याला दुर्मिळ शोध म्हणून वर्णन केले आहे. येत्या १० ते १५ दिवसांच्या धोक्यांची माहिती देणारे उपकरण. यामुळे शेतकर्‍यांना प्रतिबंध करण्याची आणि आगाऊ उपाययोजना करण्याची संधी मिळते. या यंत्राच्या साहाय्याने कीटक-रोगांमुळे होणार्‍या मोठ्या नुकसानीपासूनही शेतकर्‍यांना वाचवता येते. या शोधाला क्रांतीकारण शोध मानला जात आहे.

Exit mobile version