काय सांगता? काकडी आणि खिर्‍यामुळे भारत ठरला सर्वात मोठा निर्यातदार

Cucumber-export

जळगाव : काकडी आणि खिरे यांचा समावेश मुख्य भाज्यांमध्ये होत नसला तरी जेवणावेळी सलाडमध्ये यांचा समावेश असतोच. काही महिन्यांपुर्वी काकडीला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी रस्त्यावर काकड्या फेकून दिल्याच्या बातम्या अनेकांनी वाचल्याच असतील. मात्र काही महिन्यांपुर्वी १ व २ रुपये प्रति किलो दराने मिळणार्‍या काकडी आणि खिर्‍यामुळे भारताला कोट्यवधी रुपये कमावून दिले आहे, हे कुणी सांगितल्यास त्यावर विश्‍वास बसणार नाही.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, वाणिज्य विभागाच्या निर्देशांनुसार, कृषि आणि अन्नप्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरणने पायाभूत विकास, जागतिक बाजारात उत्पादन प्रोत्साहन देण्याबाबत अनेक उपक्रम राबवले आहेत. याची परिणीती म्हणून काकडीची निर्यात करणारा भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार ठरला आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर २०२० -२१ या काळात भारताने जगात काकडी आणि खिरी काकडीची १ लाख २३ हजार ८४६ मेट्रिक टन म्हणजेच, ११४ दक्षलक्ष डॉलर्सची (८५० कोटी रुपये) निर्यात केली आहे. भारताने गेल्या आर्थिक वर्षात, कृषि प्रक्रिया उत्पादने, लोणच्याची काकडी अशा पदार्थांच्या उत्पादनात, २०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा (१६६४ कोटी रुपये) अधिक अधिक मूल्यांची निर्यात केली.

हे देखील वाचा :

Exit mobile version