थंड पाण्यात शिजवला जाणारा, डायबिटीसवर गुणकारी रंगीत तांदूळ

color tandul 1

नाशिक : तांदळाच्या उच्च प्रतींवर चर्चा करतांना फारफार बासमती राईवर चर्चा येवून थांबते. मात्र आज आपण अशा तांदळावर चर्चा करणार आहोत जो चक्क थंड पाण्यात शिजवला जातो, तो लाल, हिरवा, काळा रंगाचा असतो. मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सने समृद्ध असलेल्या या तांदळाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हा परिणाम कृषी संशोधन केंद्रानेही प्रमाणित केला आहे.

अलीकडच्या काळात शेतीत नवनवे प्रयोग करण्याचे प्रमाण वाढत आहेत. अनेक शेतकरी पारंपारिक शेतीची चौकट तोडून नवे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असंच काहीसं चंपारणच्या रामनगर ब्लॉकच्या सोहसा पंचायतीत पाहायला मिळत आहे. विजयगिरी येथील रहिवासी लाल, हिरवा, काळा तसेच जादूई तांदूळ लागवड करतात. या तांदळाची खास गोष्ट म्हणजे या भाताकडे बघितल्यावर कुणीतरी रंग लावल्याचा भास होतो. मात्र या तांदळाला कुठलाही रंग लावलेला नसून त्याचे उत्पादनच तशा प्रकारे घेतले जात आहे.

सेंद्रीय शेती करणारे प्रगतिशिल शेतकरी विजयगिरी यांनी लाल, हिरवा, काळ्या भाताची लागवड सुरू केली होती. रंगीत भाताच्या लागवडीतून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत असून, त्यातून त्यांना चांगला नफाही मिळत आहे. या मॅजिक राईसचीही शेतीला देशभरातून तीस ते चाळीस हजार शेतकरी जुळले आहेत, ज्यांना ते दरवर्षी लाल, हिरवे, काळे आणि जादूई भाताचे बियाणे पुरवतात.

Exit mobile version