कडधान्य पिकांचा दैनंदिन वापर वाढावा : कुलगुरू डॉ. विलास भाले

Cereals

अकोला : मानवी शरीरातील विविध अंगांचे निकोप वाढीसाठी आहारामधील कडधान्यांचे महत्त्व अनादिकालापासून सर्वांनाच ज्ञात असून शरीराच्या निरोगी व निकोप वाढीसाठी कडधान्य पिकांचा दैनंदिन वापर अगत्याचा असल्याचे प्रतिपादन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

जागतिक कडधान्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या संदेशात डॉ. भाले यांनी देशांतर्गत किंबहुना राज्यांतर्गत कडधान्य पिकांचा विचार करता विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. विलास खर्चे यांचे मार्गदर्शनात कडधान्य संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ वैद्य आणि त्यांची संपूर्ण चमू समाधानकारक कामगिरी करत असल्याचे सांगताना या विभागाने गत पांच दशकांमध्ये परिस्थितीनुरूप अनुकूल बदल करत अल्पकालावधीत परिपक्व होणारे, कीड-रोगांना कमी बळी पडणारे अधिक फायदेशीर कडधान्य पिकांचे विविध वाण निर्मितीसाठी आणि प्रसारासाठी आघाडी घेतली असल्याचे समाधानकारक वक्तव्य केले.

विद्यापीठ संशोधित मूग, उडीद व तूर या खरीप हंगामातील पिकांना सोबतच रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे राष्ट्रीय स्तरावर विविध वाण प्रसार करीत शेतकरी बांधवांना आणि देशांतर्गत जनतेला सक्षम असे पर्याय उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. तर संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांनी कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आजवरची वाटचाल अधोरेखित करतांना आजतागायत कडधान्य पिकांची 29 वाण शिफारशीत केल्याचे सांगितले.

तर संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांनी कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आजवरची वाटचाल अधोरेखित करतांना आजतागायत कडधान्य पिकांची 29 वाण शिफारशीत केल्याचे सांगितले. यामध्ये प्रामुख्याने हरबरा पिकांमध्ये काबुली हरभरा, पीकेव्ही काबुली 2, पीकेव्ही काबुली 4, देशी हरभरा वाण गुलाबी हरभरा -गुलक 1, उसळी साठी वापरात येणारा हिरव्या रंगाचा हिरवा चाफा व पीकेव्ही हरिता या पिकांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच देशी हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण जॅकी -9218, यासह नुकतेच विकसित केलेले वाण पीडीकेव्‍ही कांचन व पीडीकेव्‍ही कनक शेतकरी बांधवांनी मोठ्या आत्मविश्वासाने स्वीकारले आहेत.

विद्यापीठाच्या या संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या हरभरा पिकांच्या वाणा खालील क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 40 टक्के पेक्षा जास्त विभागावर प्रसार झाल्याचे डॉ. खर्चे यांनी अवगत केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात तथा संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांचे नेतृत्वात विद्यापीठाचा कडधान्य संशोधन विभाग परिस्थितीनुरूप बदलांना प्राधान्य देत सर्वंकष पीक वाण तथा शिफारसी प्रसारित करत शेतकरी बांधवांना संपन्न संपन्नतेकडे नेण्यासाठी अग्रेषित असल्याचे कडधान्य संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ वैद्य यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version