ऊसतोड कामगारांच्या हितासाठी समाजकल्याण विभागाने हा घेतला निर्णय

मुंबई : ऊसतोड कामगारांच्या हिताचा विचार करीत सामाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गाळपानंतर सहकारी किंवा खासगी साखर कारखान्यांना प्रती टन १० रुपये हे स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे जमा करावे लागणार आहेत. कारखान्याच्या माध्यमातून जेवढा निधी जमा होईल तेवढीच भर राज्य सरकारची राहणार आहे. हा निधी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठीच वापरला जाणार आहे.

साखर कारखान्यांना दोन टप्प्यांमध्ये प्रती टन १० रुपयांप्रमाणे पैसे हे जमा करावे लागणार आहेत. गाळप हंगाम सुरु होऊन तीन महिने झाले आहेत. त्यामुळे १ जानेवारीपर्यंतच्या गाळपाचे पैसे हे १५ जानेवारीपर्यंत जमा करावे लागणार आहेत तर १ जानेवारी नंतर गाळप संपेपर्यंतचे पैसे हे गाळपानंतर १५ दिवसांनी जमा करावे लागणार आहेत अशा सुचना साखर आयुक्त यांना देखील देण्यात आल्या आहेत.

काय आहे शासन निर्णय?

साखर कारखान्यांनी हा निधी त्यांच्या ताळेबंदातून अदा करायचा आहे. शेतकर्‍यांच्या एफआरपी रकमेतून ही रक्कम कट करता येणार नाही. या रकमेचा शेतकर्‍यांवर कसलाही भर पडणार नाही. त्यामुळे सहकार विभाग व साखर आयुक्त हे प्रत्येक साखर कारखान्याचे गाळप, उत्पादन काढून त्याचा अहवाल सामाजकल्याण विभागाकडे सपूर्द करणार आहेत. ऊसतोड कामगारांसाठी राबविण्याच येणार्‍या वेगवेगळ्या योजनांसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.

Exit mobile version