बर्ड फ्लूच्या भितीने अंड्याच्या दरात घट

eggs

वर्धा: बर्ड फ्लूची भीती व भाजीपाल्याचे दर कमी तसेच तापमानात वाढ झाल्याने गेल्या आठवडाभरात अंड्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. परिणामी, अंड्याच्या दरात 100-120 रुपयांचा घसरण झाली आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून विक्रीवर परिणाम झाला आहे. कोरोनाकाळात प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी नागरिक अंड्याला पसंती देत होते.

या काळात अंड्याच्या विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात दर वधारल्याने नागरिकांना खिशाला कात्री देऊन खरेदी करीत होते. त्यानंतर हिवाळ्यात अंडी ही उष्ण आणि अधिक प्रमाणात प्रोटिन्स देणारी असतात. त्यामुळे साधारपणे या काळात अंड्यांच्या मागणीत वाढ होत असली तरी दर मात्र कायम होते. मात्र, आता बर्ड फ्लूची भीती आणि अन्य कारणांमुळे गेल्या आठवडाभरात अंड्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत अंड्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता स्थानिक विक्रेत्यांनी व्यक्त केली.

हिवाळ्यात अंड्यांच्या किमती दरवर्षीप्रमाणे वाढल्या होत्या. वर्धा शहरात तेलंगाणा राज्यातून अंडी स्थानिक विक्रेत मागावत असतात. दररोज एक ते दीड लाख अंडी विक्री होत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. या ठिकाण्यावरून तालुकास्थळी अंड्याची विक्री केली जाते. त्यामुळे विविध ठिकाणांहून अंडी मागवली जातात.

गत आठवड्याभऱ्यापासून अंड्यांचे दर घसरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. बर्ड फ्लू प्रादुर्भाव आणि भाज्यांचे दर कमी तसेच तापमान वाढ झाल्याने अंड्यांचा खप कमी झाला आहे. त्यामुळे अंड्याच्या दरावर परिणाम झाला आहे. आठवडाभरापूर्वी वर्ध्यात अंड्यांची किंमत प्रति शेकडा 460 ते 470 रुपये होती. मात्र, आता तो 360 ते 370 रुपये प्रति सेकंदावर पोहोचला आहे. उन्हाळी हंगाम आणि बर्ड फ्लूमुळे दर आणखी खाली येण्याची अपेक्षा असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दर कमी झाल्याने शहरातील व्यापा-यांचे मोठे नुकसान होत आहे.

कसे ठरवले जातात अंड्याचे दर?

अंडी पोल्ट्रीपासून विक्रेत्याच्या दुकानात येईपर्यंत या किंमती 4 वेळा बदलतात. प्रथम दर राज्यानुसार ठरवले जातात. मग घाऊक विक्रेता आणि किरकोळ विक्रेता एकत्रितपणे दरासंदर्भात निर्णय घेतात. त्यानंतर ही अंडी ग्राहक आणि आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतात.

पोल्ट्री फार्म हाऊसचे मालक आणि यूपी पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष नवाब अली म्हणतात की, सध्या पोल्ट्री फार्ममधून 100 अंडी 295 रुपयांपर्यंत विकली जात आहेत. या पोल्ट्री फार्ममधून अंडी मोठ्या घाऊक विक्रेत्यापर्यंत पोहोचतात. वाहतूक आणि कामगार खर्च पकडून, ​​ या 100 अंड्यांवर 15 ते 20 रुपयांचा नफा होतो. इथल्या मोठ्या घाऊक विक्रेत्याकडून छोटे घाऊक विक्रेते अंडी खरेदी करतात. परंतु, यात त्यांना जास्त नफा मिळत नाही. हे लोक 30 अंड्यांच्या क्रेटवर 3 ते 5 रूपये कमवतात. त्यानंतर उर्वरित किरकोळ विक्रेते बाजारातील मागणी व साठे या गोष्टी लक्षात घेऊन एक ते सव्वा रुपयांची कमाई करतात.

हे देखील वाचा :

Exit mobile version