नागपूर संत्र्याने जिंकली दुबई!

orange-business-worth-rs-1500-crore-annually-in-maharashtra-alone

नागपूर : दुबई येथील ग्राहकांचा नागपूर संत्र्यास उत्तम प्रतिसाद लाभला असून मध्यपूर्व देशांमध्ये नागपूर संत्र्याची मागणी वाढलेली आहे. अशाच प्रकारे भौगोलिक मानांकन असलेल्या आपल्या नागपूरी संत्र्यास मोठी बाजारपेठ आहे. विदेशात नागपुरी संत्रा गोडीने खाल्ले जाते. विशेषकरुन महाराष्ट्रातील संत्र्याचा उत्कृष्ट स्वाद, आंबट-गोड या अप्रतिम चवीमुळे आणि त्याचा हवाहवासा वाटणारा सुवास यामुळे नागपुरी संत्रा जगप्रसिद्ध आहे. म्हणून संत्र्याला विशेष मागणी असते.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा व खाजगी निर्यातदार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच दुबई येथे संत्र्यांची निर्यात करण्यात आली असून नागपूर संत्र्यास मध्यपूर्वेतील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर येथील संत्रा कृषि पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील पॅकहाऊसमध्ये आणून संत्रा वॅक्सिंग करण्यात येतो. त्यानंतर संत्र्यांचे प्रशीतकरण करून रेफर कंटेनरद्वारे संत्रा निर्यातीची सुरूवात करण्यात आली होती.

पंजाबच्या टापटीप दिसणाऱया संत्र्याच्या तुलनेत नागपुरी चवदार संत्री निर्यातीत माघारली होती. परंतु यावरही आपल्या मार्केटिंग कौशल्याने संत्र्याचे आकर्षक पॅकिंग करुन संत्र्याच्या निर्यातीचे प्रयत्न करण्यात आले. प्रथमच अशाप्रकारच्या पॅकिंगमधील नागपूरी संत्री दुबईत निर्यात झाली. चवीमुळेच संत्र्यांची दखल घेतली गेली. चांगला प्रतिसाद मिळाला.

समुद्रमार्गेच निर्यात स्वस्त पडत असल्याने व्यवसाय आर्थिकदृष्ट्या देखील सरस ठरला. पुढे युरोपीय बाजरपेठेत दाखल होण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  श्रीलंका, बांगलादेश तसेच मध्य आशियातील विविध देशांमध्ये नागपुरी संत्र्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु ग्राहकांच्या मागणीनुसार दर्जेदार संत्रा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आखाती व युरोपीय देशांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाव असल्यामुळे निर्यातीला अपेडा, कृषि पणन मंडळामार्फत प्रोत्साहन देण्यात येत आहे.

निर्यात सुविधा केंद्रे

राज्यातून फळे व भाजीपाला निर्यातीत वाढ होणेकामी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकष पूर्तता करणारे पायाभूत सुविधांची राज्यात गरज होती. केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने राज्यामध्ये कृषि पणन मंडळामार्फत ४४ निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी करणेत आलेली आहे. यामध्ये विदर्भामध्ये खालील प्रमाणे निर्यात सुविधा केंद्रे व फळे व भाजीपाला आधुनिक सुविधा केंद्रे उभी केलेली आहेत.

लिंबूवर्गीय फळाला मोठे व्यावसायिक मूल्य

लिंबूवर्गीय फळांचा जगभर बोलबाला आहे. सर्वात जास्त खाल्ले जाणारे हे फळ आहे. संत्रा फळाच्या रसात अ, ब, क या जीवनसत्वाशिवाय फळशर्करा, आम्ल, कॅल्शियम, फॉस्फरस व लोह ही खनिजे आहेत. फळांचा रस काढल्यानंतर राहिलेल्या चोथ्यापासून पशुखाद्य तर फळांच्या सालीपासून निघालेले तेल हे सुगंधी केश तेल तयार करण्याकरिता वापरता येते. त्यामुळे लिंबूवर्गीय फळाला मोठे व्यावसायिक मूल्य आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version