१ जून पुर्वीच कापूस बियाणे विक्रीची मागणी; बियाणे कंपन्यांनी घेतली ही भुमिका

cotton-seed

पुणे : कृषी विभागाने १ जून नंतर कापूस बियाणे विक्रीला परवानगी दिली आहे. याविरोधात शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी उमटत आहे. आता कृषी विभागाच्या या निर्णयाविरुध्द बियाणे कंपन्यांनी भुमिका घेतली आहे. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. शेतकर्‍यांना वेळेत बियाणे मिळाले नाही तर ते इतर राज्यातून बियाणांची खरेदी करतील त्यामुळे राज्यातही १ जून पुर्वीच कापूस बियाणे विक्रीची परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र फर्टिलायझर्स सीडस्, डिलर्स यांनी केली आहे.

हे देखील वाचा : शेतकर्‍यांचा यंदाही कापूस व सोयाबीनवरच विश्‍वास; जाणून घ्या सविस्तर

हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत १ ते १० मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून १५ मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकर्‍यांना १ जून नंतर विक्री केले जाणार आहे.

हंगामपूर्वीच कापसाची लागवड केली की, बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतोच. शिवाय त्याचा इतर पिकांवरही परिणाम होतो म्हणून सावध पवित्रा म्हणून कृषी विभागाने १ जून नंतर बियाणे विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, वेळेपूर्वीच पाऊस येत असल्याने बियाणे खरेदीला परवानगी मिळावी म्हणून खत-उत्पादक आणि बियाणे उत्पादक कंपन्यांनी केली आहे.

Exit mobile version