पुणे : गत हंगामात अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला असला तरी कापूस व सोयाबीन या पिकांना विक्रमी भाव मिळला. यामुळे उत्पादन घटल्यानंतरही शेतकर्यांचे झालेले नुकसान भरुन निघाले. गत वर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदाही शेतकर्यांचा कल याच दोन्ही पिकांकडे दिसून येत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा राज्यात ४६ लाख हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन तर ४२ लाख हेक्टर क्षेत्रफळावर कापसाचा पेरा होईल, असा अंदाज आहे.
कापसाला विक्रमी दर मिळाला असल्याने यंदाच्या खरिपात लागवड वाढणार यामध्ये शंका नाही. सोयाबीन आणि कापसामध्ये लागवड क्षेत्रावरुन स्पर्धा होत असली तरी शेतकर्यांचा कल हा सोयाबीनवरच राहणार आहे. पेरणी पासून काढणीपर्यंत कमी खर्च आणि अधिकचे उत्पादन यामुळे शेतकरी कापसाला प्राधान्य देत आहे.
हे देखील वाचा : कापूस आणि सोयाबीनचे गणित गव्हालाही लागू पडतेय; जाणून घ्या कसे?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने खरीपपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. पेरणीपूर्वी नांगरण, कोळपणी, मोगडा यासारखी कामे आटोपून घेतली जात आहेत. तर काही शेतकर्यांची कामे पूर्ण झाली असून आता प्रतिक्षा आहे ती पावसाची. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन की कापूस अशीच स्थिती शेतकर्यांची होणार आहे. याकरिता या दोन्ही पिकांचे विक्रमी दर कारणीभूत ठरणार आहेत. असे असले तरी कृषी विभागाने वर्तवलेला अंदाज तेवढाच महत्वाचा असून यंदाही खरिपात सोयाबीनचीच सरशी राहणार आहे.