वाईन ला दारू नका म्हणू; असे कोण म्हणतेय?

wine

नाशिक : ठाकरे सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री निर्णय घेतल्यानंतर, सर्व बाजुंनी कडाडून टिका होण्यास सुरवात झाली आहे. परंतु, द्राक्ष बागायतदारांनी मात्र, निर्णयाला पाठींबा दर्शवित वाईनला दारू म्हणू नका असे म्हटले आहे. ठाकरे सरकारने नुकतेच 1000 स्क्वेअर फुट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली, विपक्ष दल भाजपाने याचा कडाडून विरोध केला आहे.

द्राक्ष बागायतदारांनी दिलेल्या माहितीनूसार, महाराष्ट्रात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली आहे, या एवढ्या मोठ्या क्षेत्रातुन 40000 द्राक्ष बागायतदार आपला उदरनिर्वाह भागवतात. त्यामुळे ठाकरे सरकारचा एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय द्राक्ष बागायतदारांच्या हिताचा असून यामुळे 40000 द्राक्ष बागायतदार आर्थिक सुबत्ता प्राप्त करू शकतात.

श्रीमान अण्णा हजारे यांनी या निर्णयाचा विरोध केला शिवाय त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आमरण उपोषण करण्याचे देखील सांगितले, याच पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदारांनी अण्णा हजारे यांना एक निवेदन दिले आहे ज्येष्ठ समाजसेवक श्रीमान अण्णा हजारे द्राक्ष बागायतदार संघटनेच्या मताचा आदर करतील अशी आशा संघटनेच्या उपाध्यक्षांनी व्यक्त केली, तसेच सांगितले की सरकार फळांच्या फुड प्रोसेसिंग साठी अनुदान देते, हा देखील फुड प्रोसेसिंगचा एक भाग असून केवळ द्राक्षाचा रस आहे याची तुलना दारूशी करणे कदापि योग्य नाही. पुढे संघटनेने सांगितले की, ठाकरे सरकारचा हा निर्णय द्राक्ष बागायतदारांच्या हिताचा आहे .

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचे उपाध्यक्ष कैलास भोसले, यांच्या नेतृत्वात यासंदर्भात अण्णा हजारे यांना निवेदन देण्यात आले. द्राक्ष बागायतदार संघटनेचे निवेदन देण्याचे कारण असे की, 14 तारखेपासून अर्थात आज पासून ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे ठाकरे सरकारच्या वाईन विक्री धोरणविरोधात आमरण उपोषणासाठी बसणार होते. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघटनेने अण्णांना निर्णयाचा विरोध न करण्याचे निवेदन केले. यासंदर्भात त्यांनी अण्णांना पत्र देखील दिले आहे. यावेळी द्राक्ष बागायतदार संघटनेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की ठाकरे सरकारने एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय द्राक्ष बागायतदारांच्या हिताचा आहे, द्राक्ष बागायतदार ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे हात खोलून स्वागत करीत आहे. द्राक्ष बागायतदारांनी पुढे बोलताना सांगितले की, ठाकरे सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात जो गदारोळ चालू आहे तो त्वरित थांबला पाहिजे व या द्राक्ष बागायतदारांच्या हिताच्या निर्णयावर राजकारणी लोकांनी आपल्या पोळ्या भाजल्या नाही पाहिजेत, यावेळी संघटनेने वाईन ला दारू म्हणू नये असे देखील मत व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version