पांढर्‍या सोन्यासाठी असे असावे ठिबक सिंचन

drip-irrigation-for-cotton-farming

शेतशिवार । रावेर : संकरित कपाशीसाठी पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने बोंड वाढीचा काळ हा जास्त संवेदनशिल असतो. पाणी टंचाईच्या काळात बागायती कपाशीला ६०% बाष्पोउर्त्सजना एवढे पाणी द्यावे. तसेच पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. संकरीत वाणांसाठी ठिबक सिंचन पद्धत अवलंबताना मध्यम जमिनीत दोन ओळीतील अंतर ७५ सें.मी. ठेवावे व दोन झाडातील अंतर ७५ सें.मी. ठेऊन दोन ओळींच्यामध्ये एक उपनळी टाकावी.

दोन झाडांसाठी एक तोटी ७५ सें.मी. अंतरावर लावावी. यात दोन जोड ओळीतील अंतर १५० सें.मी. असते तर दोन उपनळ्यांमध्ये अंतर २२५ सें.मी. असते. भारी जमिनीत संकरित वाण वापरताना दोन ओळीत ९० सें.मी. अंतर ठेवावे. दोन झाडातील अंतर ९० किंवा १२० सें.मी. ठेवावे व तोटी ९० किंवा १२० सें.मी. अंतरावर लावावी. यात दोन जोडओळीत १८० सें.मी. तर दोन उपनळ्यांमध्ये २७० सें.मी. अंतर असते.

(साभार : कृषिदर्शनी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)

Exit mobile version