‘या’ जिल्हा परिषदेतर्फे शेतकऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षण

drone-training

उस्मानाबाद : शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा परिषदेने शेतकर्‍यांना ड्रोन प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.

५० लाखांची तरतूद

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतात कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन देण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यात प्रत्येकी १ ड्रोन देण्यात येणार असून ते ड्रोन चालविण्यासाठी शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वेळेची बचत होणार आहे.

ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करताना शेतकर्‍यांना केवळ मंजूर कीटकनाशकांचाच वापर करावा लागणार आहे. त्यासाठीची उंची किती राहणार आणि प्रमाणदेखील निश्चित केले जाणार आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने हवेतून फवारणी करण्यापूर्वी संबंधित ऑपरेटरला २४ तास आगोदर तेथील स्थानिकांना याची माहिती द्यावी लागणार आहे. ड्रोन चालवण्यासाठी संबंधित व्यक्तीला योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रीकी महाविद्यालयाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद येथील सेन्सकरी लॉब्सच्या मदतीने कमी खर्चीक व वेळेची बचत करणारे आधुनिक फवारणी ड्रोन आणले असून त्याचे पळसवाडी शिवारात प्रात्याक्षिके घेण्यात आले. कॉलेजमधील ६० विद्यार्थांना प्रशिक्षण देऊन परिसरातील शेतकर्‍यांची पिक फवारणी करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version